Supriya_Sule
Supriya_Sule 
पुणे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचं स्वागतच, पण...; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे

सकाळ वृत्तसेवा

कोळवण (पुणे) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणाऱ्यांचे स्वागत आहे, परंतु सत्तेचा वापर जनसेवेसाठी करावा. तसेच पक्षाच्या माध्यमातून नवीन सदस्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाईल, असे प्रतिपादन संसद महारत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी भूगाव येथे केले. मुळशी तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आणि नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी खासदार सुळे बोलत होत्या. 

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, ज्येष्ठ नेते रामभाऊ ठोंबरे, राजाभाऊ हगवणे, सविता दगडे, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, जि. प. सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, अमित कंधारे, माजी सभापती कोमल वाशीवले, राधिका कोंढरे, दिलीप दगडे, अंकुश उभे, युवकाध्यक्ष निलेश पाडाळे, सुनिल चांदेरे, निखिल मारणे, वैशाली गोपालघरे, रुपाली ढोकळे,भाऊ केदारी, अंकुश मोरे, जितेंद्र इंगवले, विलास अमराळे, सतीश सुतार, प्रशांत रानवडे तसेच विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

सुळे पुढे म्हणाल्या की, मुळशीतील रस्त्याच्या संदर्भात चर्चा झाली आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निधी नाही. पुढील वर्षभरात रस्त्याचा प्रश्न सुटेल. पुणे-दिघी बंदर रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकायचा प्रस्ताव दिला आहे. 

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नवीन सदस्यांना तालुकास्तरावर ट्रेनिंग देणार आहे. सर्व सदस्यांनी याचा लाभ घ्यायला हवा. 15 व्या वित्त आयोगाच्या निधीचा वापर गावचा विकास करण्यासाठी केला पाहिजे. आगामी काळात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे सदस्य हे पक्षाचे असले पाहिजेत, अशी इच्छा रणजित शिवतरे यांनी व्यक्त केली. 

यावेळी भाजप कार्यकर्ते कोंढावळे गावचे माजी सरपंच लहू चव्हाण आणि तालुक्यातील विविध गावातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला. यावेळी सूत्रसंचालन प्रा. संतोष गावडे यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केले, तर आभार कार्याध्यक्ष अंकुश मोरे यांनी मानले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT