Pune esakal
पुणे

Pune: खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाखांची लाच घेताना सहाय्यक पोलीस निरीक्षकाला रंगेहाथ अटक

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील निगडी पोलिस चौकीत पुणे 'एसीबी'ची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे - खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची लाच घेताना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत निगडी पोलिस चौकीतील एका सहायक पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी आणि मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रात्री अटक केली.

याबाबत एका ४८ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक अमोल प्रकाश कोरडे, पोलिस कर्मचारी सागर तुकाराम शेळके आणि मध्यस्थ सुदेश शिवाजी नवले (वय 43, रा.वाल्हेकरवाडी, चिंचवड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. निगडी प्राधिकरण येथील सेक्टर क्रमांक २७ मधील तक्रारदाराच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिला तक्रारदार यांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला उधार आणि बँकेमधून कर्ज काढून पैसे दिले होते. बँक कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे उधार दिलेल्या पैशांची मागणी केली. त्यावर त्यांनी महिला तक्रारदाराच्या विरोधात निगडी पोलिस ठाण्यात अर्ज दिला होता.

हा अर्ज चौकशीसाठी सहायक पोलिस निरीक्षक अमोल कोरडे यांच्याकडे आला. त्यावेळी तक्रारदाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी अमोल कोरडे, पोलिस कर्मचारी सागर शेळके आणि खासगी मध्यस्थ नवले यांनी तक्रारदाराकडे दीड लाख रुपये लाचेची मागणी केली. याबाबत महिला तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे कार्यालयात तक्रार दिली होती.

या तक्रारीची पडताळणी केली असता, कोरडे आणि शेळके यांच्यावतीने नवले याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. ही रक्कम नवले याने स्वीकारल्यानंतर या तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, निगडी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक माधुरी भोसले, पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, पोलिस हवालदार नवनाथ वाळके, पोलिस कर्मचारी सौरभ महाशब्दे, शिल्पा तुपे, पांडुरंग माळी यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli MIDC : सैनिक टाकळीत एमआयडीसीचा मार्ग मोकळा? तरुणांना रोजगाराच्या हजारो संधी होणार उपलब्ध; आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकरांचा दावा

Inspiring Farmer Story : सिमला मिरचीची शेती अन् 20 लाखांचे उत्पन्न! पारंपरिक शेतीला फाटा देत माजलगावच्या ज्योती डक यांनी 4 एकर ढोबळी मिरचीतून कमावले लाखो रुपये

Ganeshotsav: हिंदू धर्मात विसर्जनाचा उल्लेख आहे? लेखी पुरावा सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींना या देशाबद्दल किंवा इथल्या लोकांबाबत अजिबात आदर नाही- भाजप खासदार प्रदीप कुमार सिंग

Maratha Reservation: टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच: मनोज जरांगे- पाटील; प्रमाणपत्र रद्द करून जातीयवादी भूमिका

SCROLL FOR NEXT