Crime Sakal
पुणे

हॉटेल मालकावर वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक

धायरी येथील हॉटेल मालकावर धारदार शस्त्रांनी वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक वेल्हे येथे अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - धायरी येथील हॉटेल मालकावर (Hotel Owner) धारदार शस्त्रांनी वार (Attack) करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक वेल्हे येथे अटक (Arrested) केली. हि घटना 21 ऑगस्ट रोजी धायरी येथे घडली होती.

ओमकार संतोष सातपुते (वय 18), तेजस गणेश निवंगुणे (वय 20) आणि अनिकेत विनायक जाधव (वय 21, तिघेही रा. धायरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरी येथील गणेशनगर परिसरात असणाऱ्या "हॉटेल गारवा' या बिर्याणी हॉटेलचे मालक व कर्मचाऱ्यांसमवेत ओंकार सातपुते, संकेत मिरगल यांची मागील शनिवारी दुपारी चार वाजता किरकोळ कारणवरून भांडणे झाली. याच भांडणाच्या रागातून अनिकेत जाधव, वैष्णव उर्फ बापु झांबरे, महेश संजय उबाळे, ओंकार सातपुते व संकेत मिरगल यांनी हॉटेलमध्ये घुसुन तोडफोड करीत त्यांच्यावर वार धारदार शस्त्राने वार केले होते. या घटनेत हॉटेलचे मालक गंभीर जखमी झाले होते.

दरम्यान बुधवारी खंडणी विरोधी पथकाचे (क्रमांक 1) पोलिस अधिकारी तडीपार करण्यात आलेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस कर्मचारी रमेश चौधर, गजानन सोनवलकर यांना संबंधीत गुन्ह्यातील तीनही आरोपी पुरंदर येथील येथील डोंगर परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा माग काढत तिघांनाही बेड्या ठोकल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Corporation : मालेगाव मनपाचा सत्तेचा पेच सुटणार? सेक्युलर फ्रंटची शिवसेनेला उपमहापौरपदाची ऑफर!

Mumbai Crime : रेल्वे स्टेशनवर प्राध्यापकाची हत्या, मुंबई पोलिसांनी १२ तासांत फरार आरोपीला केली अटक, प्रकरणाचा 'असा' लावला छडा

Crime News : मोबाईलवर बोलताय? सावधान! सटाण्यात हातातील फोन पळवणारा १९ वर्षीय चोरटा जेरबंद

मेटा वाचत आहे तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट मेसेज? एंड-टू-एंड एन्क्रिप्शनच्या दाव्यावर पेटला वाद; भारतासह 4 देशातून तक्रार दाखल

Startup loan fraud case : प्रिंटिंग व्यवसाय स्टार्टअपला ५ कोटी कर्ज; ७० लाख फी घेतली, ६ परप्रांतीयांनी तरूणाला गंडवलं अन्

SCROLL FOR NEXT