crime case sakal
पुणे

लोणीकंद येथील बापलेकाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक

पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातुन टोळक्‍याने बापलेकावर धारदार शस्त्रांनी वार करुन त्यांचा खुन केल्याच्या घटनेतील तीन आरोपींना लोणीकंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

सकाळ वृत्तसेवा

पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातुन टोळक्‍याने बापलेकावर धारदार शस्त्रांनी वार करुन त्यांचा खुन केल्याच्या घटनेतील तीन आरोपींना लोणीकंद पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पुणे - पुर्वी झालेल्या भांडणाच्या रागातुन टोळक्‍याने बापलेकावर धारदार शस्त्रांनी वार करुन त्यांचा खुन (Murder) केल्याच्या घटनेतील तीन आरोपींना (Accused) लोणीकंद पोलिसांनी बेड्या (Police Arrested) ठोकल्या. हि घटना बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास लोणीकंदमध्ये (Lonikand) घडली होती.

प्रतिक अनिल कंद (वय 28 ), आशुतोष नानासाहेब शिंदे आणि नानासाहेब शिंदे (सर्व रा. लोणीकंद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. प्रथमेश उर्फ सनी कुमार शिंदे (वय 22), कुमार मारूती शिंदे (वय 55, दोघेही रा. शिंदे वस्ती, लोणीकंद) अशी खून झालेल्या बाप-लेकाची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सचिन शिंदे नावाच्या तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणी प्रथमेश ऊर्फ सनी शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल होता. संबंधित गुन्ह्याप्रकरणी तीन महिन्यांपूर्वी तो जामीनावर कारागृहाबाहेर आला होता.

बुधवारी रात्री सातच्या सुमारास प्रथमेश उर्फ व त्याचे वडील कारमधून लोणीकंदमधून शिंदे वस्तीकडे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून कारमधून आलेल्या प्रतीक कंद, आशुतोष शिंदे व नानासाहेब शिंदे यांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने सनीवर धारदार शस्त्रांनी वार केले. त्यावेळी वडील कुमार शिंदे हे सनीला वाचविण्यासाठी गेले. त्यावेळी टोळक्‍याने त्यांच्यावरही धारदार शस्त्रांनी वार केले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही मृत्यु झाला. या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. त्यानंतर लोणीकंद पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, पोलिस निरीक्षक राजेश तटकरे, सहाय्यक क पोलिस निरीक्षक निखील पवार, पोलिस उपनिरीक्षक सुरज गोरे यांच्या पथकाने हि कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पावसाचा जोर पुन्हा वाढणार! महाराष्ट्रात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा; विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता

MPSC Paper Leak News: औषध निरीक्षक भरती परीक्षेवर पेपरफुटीचा आरोप, एमपीएससीचा इन्कार; अफवांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Latest Marathi News Live Update: दुबईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे राजकोट विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

Marathi Children’s Play: हैदराबादमध्ये मराठीचा डंका: ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ बालनाट्याने आंतरराष्ट्रीय रंगमंचावर जिंकली मने

Free Education: जगातील 'या' देशांमध्ये शिक्षण पूर्णपणे मोफत...सरकारच उचलते सर्व खर्च!

SCROLL FOR NEXT