arrest.jpg
arrest.jpg 
पुणे

ट्रॅक्टर चोरीप्रकरणी दौंडमधील तीन जणांना अटक

सावता नवले

कुरकुंभ (पुणे) : रावणगाव (ता. दौंड) येथील एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरची चोरी केल्याप्रकरणी तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सोमवारी (ता. २१) अटक केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रावणगाव येथील शिरसाई दूध डेअरीजवळून ८ ऑगस्ट २०२० रोजी रात्री महिंद्रा कंपनीचा ६ लाख ८० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर चोरीला गेला होता. यासंदर्भात दौंड पोलिसात गुन्हा दाखल केला होता. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला ट्रॅक्टर चोरीतील तीनही आरोपी रावणगाव येथे सोमवारी (ता. २१) येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने रावणगाव येथून गणेश नंदकुमार भागवत (वय २७, रा. पाटस), बाबासाहेब ऊर्फ भाऊ गाढवे (वय २७) व मंगेश गाढवे (वय २६, दोघे रा. रावणगाव) या तीन आरोपींना अटक केली. आरोपींकडे अधिक चौकशी केल्यास त्यांनी ट्रॅक्टर चोरी केल्याची कबुली दिली.

हा चोरीचा ट्रॅक्टर प्रवीण ऊर्फ भय्या बबन हरणावळ (रा. श्रीराम सोसायटी, इंदापूर) याला विकल्याची माहिती त्यांनी दिली. त्याआधारे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ट्रॅक्टर ताब्यात घेतला. या पथकाने तीनही आरोपी व ट्रॅक्टर दौंड पोलिसांच्या ताब्यात दिला. 
या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पोलिस हवालदार महेश गायकवाड, नीलेश कदम, सचिन गायकवाड, पोलिस नाईक सुभाष राऊत, गुरू गायकवाड, अक्षय जावळे यांचा समावेश होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT