Crime1.jpg 
पुणे

अरे बापरे ! कोविड सेंटरमधून तीन परप्रांतीय कोरोना बाधित फरार; कुठे ते वाचा

संतोष काळे/हितेंद्र गद्रे

राहू/ यवत : यवत (ता. दौंड) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटर मधून शुक्रवार (ता . २१)  तीन कोरोना बाधित फरार झाल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी 'सकाळ' ला दिली. डॉ. इरवाडकर यांनी याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

राहू (ता. दौंड) येथील सोनवणे डेअरी फार्म येथील तीन परप्रांतीयांना कोरोनाची बाधा झाल्याने  (ता. १९) त्यांना यवत येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, येथील कोरोना बाधित रुग्ण अचानक गायब झाल्याने यवत ग्रामीण रुग्णालयाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सदर परप्रांतीय रुग्ण इतरत्र गेले असल्यास या साथीचा आजार मोठ्या प्रमाणात वाढण्याची दाट शक्यता आहे. या परप्रांतीय कामगारांची सोनवणे डेअरी फार्म येथे कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

परप्रांतीय कामगार नेमके कधी आले. कोठून आले याबाबत माहिती मिळाली नाही. या परप्रांतीय कामगारांची राहू ग्रामपंचायत तसेच वैद्यकीय विभागात नोंद नाही. दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत असताना शासकीय यंत्रणा नेमकी काय करत आहे. याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. दरम्यान डॉ. इरवाडकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, परप्रांतीय कामगार काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पळून गेले. याबाबत यवत पोलिस अधिक तपास करत असून यापुढे कोविड सेंटरच्या रुग्णां संदर्भात योग्य ती खबरदारी घेतली जाईल. सोनवणे डेअरी फार्मचे मालक विजयराव सोनवणे म्हणाले की, संबंधित परप्रांतीय आमच्या येथे परत आल्यावर संबंधित विभागाला त्वरित कळवले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! टोलनाक्यावर उभ्या ट्रकला गॅस टँकरची धडक, बघता क्षणी घेतला पेट, आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

Latest Marathi Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Raigad Heavy Rain : रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा; अंबा नदी धोक्यापलीकडे, भेरव पूल पाण्याखाली, पोलादपुरात दरड कोसळल्याने नागरिकांचे स्थलांतर

Family Court Elections: कौटुंबिक न्यायालय वकील संघटनेत ‘एकता’ पॅनेलचा पूर्ण वर्चस्व; अध्यक्षपदी ॲड. सुनीता जंगम, उपाध्यक्षपदी ॲड. कोमल देशमुख व ॲड. राहुल पडवळ

बंदी असतानाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश; सलग दोन दिवसांत दोन तरुणांचा मृत्यू, पांडवकडा धबधब्यातील घटना

SCROLL FOR NEXT