plasma-therapy 
पुणे

वेल्ह्यातील या गावात कोरोनाने ठोकलाय तळ 

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्‍यातील वडगाव झांजे परिसरात आज (ता. 26) आणखी तीन जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या परिसरात एकूण बाधितांची संख्या तेवीसवर पोहचली आहे. त्यापैकी आठ जणांनी कोरोनावर मात केली आहे; तर आज बाधितांच्या संर्पकातील बारा जणांना पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून माहिती मिळाली. 

या परिसरात 9 मे रोजी पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला. त्यानंतर अवघ्या नऊ दिवसांत म्हणजे 18 मेपर्यंत येथील बांधितांची संख्या अठरावर पोहचली होती. या परिसरामधील 20 मे रोजी तीस जण व 21 मे रोजी दोन जण, असे मिळून 32 जणांपैकी तीस जणांची टेस्ट निगेटिव्ह आली होती. त्यानंतर संसर्ग साखळी तुटेल, असा प्रशासनाला विश्वास असतानाच 
21 मे रोजी पुणे महानगर क्षेत्रामधील पण मूळचे वडगाव झांजे येथील दोघांना कोरोनाची बाधा झाली. 

त्यानंतर बाधित व्यक्तींच्या संपर्कातील गावातील दोन व्यक्तींना तपासणीसाठी पाठविले. त्यानंतर 24 मे रोजी दोघांचे टेस्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या परिसरातील बाधितांचा आकडा वीसवर पोहचला आहे. तसेच, 24 मे रोजी उशिरा सहा जणांना तपासणीसाठी पाठविले होते. त्यापैकी आज तीन जणांच्या टेस्ट पॉझिटिव्ह; तर तीन जणांच्या टेस्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे या परिसरातील बाधितांची संख्या तेवीसवर पोहचली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT