Covid 19 test 
पुणे

वरवंड येथे गंभीर स्थिती; चाैदा दिवसांत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू

वरवंड (ता. दौंड) परीसरात कोरोना संसर्गाने अक्षरश: कहर केला आहे. चौदा दिवसांत गावातील तब्बल १२५ जणांना कोरानाची बाधा झाली.

सूरज यादव

वरवंड : वरवंड (ता. दौंड) परीसरात कोरोना संसर्गाने अक्षरश: कहर केला आहे. चौदा दिवसांत गावातील तब्बल १२५ जणांना कोरानाची बाधा झाली. तर यापैकी कोरोनाबाधित तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे आरोग्य व ग्रामपंचायत प्रशासनही हादरले आहे. नागरीकांनी नियमांचे पालन करावे व काळजी घ्यावे असे कळकळीचे आवाहन आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासन करीत आहे.

वरवंड परीसरात कोरोना संसर्गाने अक्षरश: थैमान घातले आहे. कोरोना आटोक्यात येण्याचे नाव घेण्यास तयार नाही. मागील चौदा दिवसांत परीसरातील १२५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यापैकी परीसरातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता पंधरा दिवसांपूर्वी वरवंडमध्ये पन्नास बेडचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. यामध्ये कोविड रॅपीड अॅंटीजेन तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रातील एकूण नऊ गावांमध्येही कोरोना संसर्गाच्या रुग्णांचा आलेख वाढत चालला आहे. पाटसमध्येही कोरोना रुग्णसंख्येची शतकाकडे वाटचाल सुरु आहे. विनाकारण फिरणाऱ्या टोळक्यांची संख्या मोठी आहे. पोलिसांचे आगमन झाले की गर्दी कमी होते. नंतर पुन्हा तीच परिस्थिती होते. अनेक दुकानदार, भाजी-फळ विक्रेते देखील मास्क न वापरणे आदी आडमुठे धोरण स्वीकारत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाला निमंत्रण मिळत आहे.

नागरीकांचा असंवेदनशीलपणा-कोरोना रुग्णांची नावे जाहीर करता येत नाही. यामुळे गावात कोण बाधीत झाले याची कल्पना मिळत नाही. परीणामी, गावातील जी मंडळी कोरोना बाधीत झाली आहे. त्यामधील अनेक जण गावात फिरताना दिसतात. किंबहुना त्यांनी तपासणीसाठी घशातील द्रव्य दिले आहेत. त्यांनी अहवाल येइपर्यंत घरात बसणे अनिवार्य आहे. पण ही मंडळी बिनधास्त गर्दी करुन फिरतात. अशा असंवेदनशीलपणामुळे परीसरात कोरोना झपाट्याने वाढत चालला आहे.

राजकीय आणि शासकीय यंत्रणेमध्ये गांर्भीयाचा अभाव-परीसरात कोरोना संसर्गाचा फैलाव वाढत चालला आहे.अशी परीस्थीती असताना देखील लसिकरण केंद्रावर लोकांची गर्दी होत असताना त्यांना कोणीच मज्जाव करीत नाही.राजकीय मंडळी देखील नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे.एकंदरीतच अनेक कारणांमुळे कोरोना लोकांच्या प्रेमात पडत चालला असल्याची टिपन्नी ग्रामस्थ करीत आहेत. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरीकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाची लक्षणे आढळल्यास तत्काळ तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन सरपंच मिना दिवेकर व उपसरपंच प्रदिप दिवेकर यांनी केले.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PMC Election: एकनाथ शिंदेंची किंमत फक्त १२ जागा, भाजप-शिवसेना युती तुटण्याच्या उंबरठ्यावर! राजकीय भूकंप येणार?

Malnourished Childrens : राज्यात १.३७ लाख मुले कुपोषित

Viral Video: थंडीने गारठलात? 50 रुपयांचा देसी हीटर पाहून तुम्हीही थक्क व्हाल, पाहा व्हायरल व्हिडिओ

CM Devendra Fadnavis : मुंबई महापालिकेत ‘कमळ’ फुलणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्‍वास

Vijay Hazare Trophy live : रोहित शर्माचा पहिल्याच चेंडूवर पुल शॉट अन् झाला बाद; देवेंद्र बोरा चमकला, जाणून घ्या कोण आहे तो

SCROLL FOR NEXT