Accident 
पुणे

पुणे : रिक्षा व टेंपोच्या धडकेत तिघांचा मृत्यू; मृतांत युवतीसह आजीनातवाचा समावेश

सकाळ वृत्तसेवा

मंचर : मंचर ते रांजणी रस्त्यावर थोरांदळे (ता. आंबेगाव) येथे सहा आसनी रिक्षा व पिकअप टेंपोची धडक होऊन तीन जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका युवतीसह आजी व नातवाचा समावेश आहे.

हा अपघात गुरुवारी संध्याकाळी सव्वासहाच्या सुमारास झाला. प्रतीक्षा यशवंत जाधव (वय 19, रा. जाधववाडी, ता. आंबेगाव), आर्यन रमेश घायतडके (वय 5) व त्याची आजी अनिता बबन कदम (वय 70, दोघे रा. थोरांदळे, ता. आंबेगाव) अशी मृतांची नावे आहेत. प्रतिक्षा नथू वाघ (वय 19) व रिक्षाचालक प्रसाद बबन सुतार (वय 33, रा. रांजणी) हे गंभीर जखमी झाले आहेत.

Video : तेंव्हापासून कुटुंबावर पवारसाहेबांचे बारीक लक्ष : अजित पवार 

रिक्षा मंचरहून रांजणीकडे जात असताना थोरांदळे येथे विरुद्ध दिशेने आलेल्या भरधाव पिकअप टेंपोची तिला धडक बसली. अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला. जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तिघे जण उपचारापूर्वीच मरण पावल्याचे उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्‍टरांनी जाहीर केले. मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर पळून गेलेल्या पिकअप चालकाचा शोध घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली जाईल, असे खराडे यांनी सांगितले.

ईशान्येतील हिंसाचार कायम; पोलिसांकडून गोळीबार

रस्त्यातच काळाची झडप
प्रतीक्षा यशवंत जाधव ही मंचरला ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण घेऊन जाधववाडीला घरी निघाली होती. तर अनिता कदम या नातू आर्यन याला उपचारासाठी रांजणीला घेऊन जात होत्या. काळाने त्यांच्यावर रस्त्यातच झडप घातली. प्रतिक्षा वाघ ही तरुणी कॉलेज संपवून मंचरहून रांजणीला घरी जात होती. ती गंभीर जखमी झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

Youth Sena Leader Car Crash: युवासेना पदाधिकाऱ्याच्या थारची दुचाकीला धडक; कामगार गंभीर जखमी, खर्च न दिल्याचा आरोप करत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT