avsari tempo 
पुणे

अबब, आंबेगावातील रस्त्यावर साचले तीन फूट पाणी  

सुदाम बिडकर

पारगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील अवसरी बुद्रुक येथे पावसाचे पाणी रस्त्यावर आल्याने सुमारे तीन ते साडेतीन फूट पाणी साचले. त्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज न आल्याने टेम्पो रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन अडकला. त्यातून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. चार दिवसांपूर्वी याच जागेवर एक टेम्पो अशाच पद्धतीने खड्ड्यात गेला होता.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
अवसरी बुद्रक येथे काल (ता. 7) सायंकाळी ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाने झोडपले. या पावसाने मंचर- पारगाव रस्त्यावरील अवसरी बुद्रुक येथील विजय ढाबा व एसआर पेट्रोलपंपाजवळच्या समोर पावसाच्या पाणी रस्त्यावर आल्याने तीन ते साडेतीन फूट पाणी साचले होते. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या पाण्यात मार्ग काढताना एका टेम्पो चालकाला अंदाज आला नाही. त्यामुळे त्याचे वाहन रस्त्याच्या शेजारी असलेल्या खड्ड्यात जाऊन अडकले. त्यातून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

दरम्यान, चार दिवसांपूर्वी याच ठिकाणी एक टेम्पो याच खड्ड्यात अडकला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करुन रस्त्याच्या कडेने पाणी काढून द्यावे, अशी मागणी अवसरी बुद्रुकचे उपसरपंच सचिन हिंगे व टाव्हरेवाडीचे सरपंच उत्तम टाव्हरे यांनी केली आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RRC Mumbai Apprentices 2026: दहावी पास तरुणांसाठी रेल्वेत प्रशिक्षणाची मोठी संधी! २८६१ अप्रेंटिस पदांसाठी अर्ज सुरू; जाणून घ्या संपूर्ण अर्ज प्रक्रिया

उद्यापासून ६ राशींचे अच्छे दिन सुरू! बुधाच्या उदयामुळे नोकरी, पैसा अन् शिक्षणात मिळणार लाभ

Latest Marathi News Live Update: अक्कलकोटमध्ये पार्किंगला थांबलेल्या ट्रकना भीषण आग

Sudeshad Taluka Mahagaon Housebreaking Theft : सुधागड तालुक्यात घरफोड्यांचे सत्र सुरूच; महागावमध्ये सलग दोन दिवस दोन बंद घरे फोडून चोरी

ऐन दिवाळीत शिंदे सेनेच्या बड्या नेत्याला अटक; बच्चू कडूंच्या त्रिशूल आंदोलन प्रकरणी मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT