पुणे

जुन्नरमध्ये तीनशे ऑक्सिजनयुक्त बेड; रेमडेसिव्हिर इंजेक्शन दोन दिवसांत मिळणार

सकाळवृत्तसेवा

नारायणगाव - कोरोना रुग्णांसाठी जुन्नर तालुक्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात एकूण तीनशे ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था केली आहे. अत्यवस्थ रुग्णांसाठी नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात रेमडेसिव्हिर इंजेक्शन दोन दिवसांत उपलब्ध होईल, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुन्नर तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या ३ हजार १६५ झाली आहे. उपचारानंतर २ हजार २४३ रूग्ण बरे झाले असून, ७९२ रुग्ण उपचार घेत आहेत. १३० कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील अडीच महिन्यात सुमारे अडीच हजार रुग्णांची वाढ झाली आहे. तालुक्यात रोज जवळपास शंभर नवीन रुग्णांची भर पडत आहेत. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवरील उपचारासाठी शासनाने लेण्याद्री व ओझर येथे कोविड उपचार केंद्र सुरू केले आहे. नारायणगाव ग्रामीण रुग्णालयात वीस ऑक्सिजन बेड व चार व्हेंटिलेटर बेडची व्यवस्था केली आहे. मात्र, फिजिशियन व भुलतज्ज्ञ नसल्याने व्हेंटिलेटर सुविधा बंद आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनयुक्त बेड वाढविण्याची मागणी होत आहे. याबाबत आमदार बेनके यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 

कोरोनाला रोखण्यासाठी अशी आहे तयारी 
- शिरोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पन्नास ऑक्सिजनयुक्त बेड सुरू करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंजुरी. 
- नारायणगाव ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा वापर रुग्णांना व्हावा, यासाठी आठ खासगी फिजिशियनची नेमणूक. 
- जुन्नर, नारायणगाव व आळेफाटा येथील खासगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी परवानगी. 
- उपचाराचे दर निश्चित केले आहेत. दरपत्रक रूग्णालयात लावणार आहे. 
- जास्त पैसे घेणाऱ्या रुग्णालयाची चौकशी करण्यासाठी ऑडिटरची नेमणूक केली आहे. 
- रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी ओझर येथे मदत केंद्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT