unconscious-bodies 
पुणे

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन वर्षांत तीनशे बेवारस मृतदेह

सकाळ वृत्तसेवा

शहरातील स्थिती; बेघर, फिरस्ते व घातपात याबाबी कारणीभूत
पिंपरी - गेल्या दोन वर्षांपासून उद्योगनगरीत बेवारस मृतदेहांचे प्रमाण वाढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वृद्ध आई-वडिलांना सोडून जाणारी मुले, बेघर, फिरस्ते व घातपात अशा विविध कारणांमुळे दोन वर्षांत तब्बल २९१ मृतदेह शहरातील विविध भागांत सापडले आहेत. त्यांचा अंत्यविधी पोलिसांना करावा लागत आहे.

संत तुकारामनगरमधील वायसीएम रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन केंद्र हे पोलिस शल्यचिकित्सक विभागाअंतर्गत येते. येथे मिळालेल्या आकडेवारीवरून गेल्या दोन वर्षांत बेवारस मृतदेहांचे प्रमाण वाढल्याचे लक्षात येते. शवविच्छेदन केंद्रात २०१८ मध्ये १५५; तर या वर्षी नोव्हेंबरअखेर १३६ बेवारस शव आढळले.

शहरात उदरनिर्वाहासाठी अनेकजण परराज्यांतून येतात. त्यात काहीजण कौटुंबिक भांडणातून; तर काही जण मानसिक आजारांनी त्रस्त असल्याने घर सोडतात. ते रेल्वे, बस स्थानके तसेच, रस्त्यावरच राहतात. त्यांना जेवण मिळणेही शक्‍य नसते. रस्त्यावर राहिल्याने साथीच्या आजाराने अनेकांचा त्यात मृत्यू होतो. या बेवारसांच्या नातेवाइकांचा शोध घेण्याचे काम पोलिस करतात. विशेष म्हणजे या मृतदेहांमध्ये काही मृत्यू हे क्षयरोग आणि एड्‌समुळे झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: आमदाराऐवजी मुलानेच दाबलं EVM चं बटण? दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणार, जिल्हाधिकारी म्हणाले...

औरंगजेबाच्या 'या' लेकीच्या स्मरणात छत्रपती शाहूंनी बांधली खास वास्तू ; आग्रा भेटीत मोठ्या बहिणीचं योगदान

T20 WC, IND vs USA: ६ ओव्हर, ४ विकेट्स! भारताला पॉवरप्लेमध्ये अमेरिकेने दिले मोठे धक्के; अभिषेक शर्मा, शिवम दुबे पहिल्याच बॉलवर आऊट

'श्रीयुत गंगाधर टिपरे २. ०' येणार नाही... केदार शिंदेंचा धक्कादायक खुलासा; चाहत्यांचा हिरमोड करणारं मोठं कारण समोर

ZP Elections 2026 Voting Live Update : पश्चिम बंगालचे मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार अग्रवाल यांनी एक आठवड्याची मुदतवाढ मागितली

SCROLL FOR NEXT