Grains Sakal
पुणे

अन्नसुरक्षा योजनेत पुणे, पिंपरीतील तीन लाख लाभार्थी

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतंर्गत प्रतिव्यक्ती सहा किलो गहू आणि चार किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्र आणि राज्य सरकारच्या अन्नसुरक्षा योजनेतील (food security scheme) लाभार्थ्यांसाठी (beneficiaries) मोफत धान्य (Free Grains) वितरण (Distribution) सुरू आहे. या योजनेंतर्गत मे महिन्यात पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri Chinchwad City) अन्नसुरक्षा योजनेतील सुमारे २५ टक्के म्हणजे तीन लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. (Three lakh beneficiaries from Pune Pimpri under food security scheme)

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेतंर्गत प्रतिव्यक्ती सहा किलो गहू आणि चार किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे. तर, पुढील महिन्यात केवळ केंद्र सरकारच्या योजनेतील मोफत धान्य शिधापत्रिकाधारकांना उपलब्ध होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाच्या कालावधीत शिधापत्रिकाधारकांसाठी मोफत धान्य देण्याचा निर्णय एप्रिल महिन्यात घेतला होता. परंतु एप्रिल महिना संपत आल्यामुळे हा गहू आणि तांदूळ मे महिन्यामध्ये वितरण सुरू करण्यात आले. राज्य सरकारच्या वतीने मे महिन्यात प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येत आहे. याशिवाय, केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत मे आणि जून या दोन महिन्यात तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत वितरित करण्यात येणार आहे. यासोबतच शिधापत्रिकाधारकांना दर महिन्याचा गहू तीन रुपये किलो आणि तांदूळ दोन रुपये दराने देण्यात येणार आहे.

३ लाख १ हजार ८८६ - शिधापत्रिकाधारकांची संख्या

१२ लाख ४३ हजार १४८ - लाभार्थी संख्या

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व रेशन दुकाने सुरू आहेत. तसेच, दुकानात गहू आणि तांदूळही उपलब्ध आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना पुरेसे धान्य मिळणार असून, कोणतीही अडचण येणार नाही.

- गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना

केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना मोफत गहू आणि तांदूळ देण्यात येत आहे. आजअखेर या दोन्ही योजनांतील सुमारे २५ टक्के लाभार्थ्यांना धान्यवाटप करण्यात आले आहे. तसेच, दर महिन्याचे नियमित धान्यही देण्यात येत आहे.

- अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी

कोरोनामुळे व्यवसाय बंद आहे. या संकटात सरकारकडून मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात आले, ही समाधानकारक बाब आहे. रेशनवर प्रतिव्यक्ती सहा किलो गहू आणि चार किलो तांदूळ मोफत मिळाला. सरकारने रेशनवर नागरिकांना चांगल्या दर्जाचा गहू आणि तांदूळ उपलब्ध करून द्यावा.

- चंद्रकांत निंबोरे, शिधापत्रिकाधारक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Leader Attack: अकोल्यात काँग्रेस नेत्यावर हल्ला; भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी दाखल आहे गुन्हा

ECI notice to Mohammed Shami: मोहम्मद शमीला निवडणूक आयोगाची नोटीस!, जाणून घ्या, नेमकं काय कारण?

Mumbai Local: मुंबई लोकलच्या लाखो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! १८ डब्यांची लोकल लवकरच धावणार; चाचणी घेणार, पण कधी?

Vijay Hazare Trophy: संजू सॅमसन स्वस्तात बाद झाला, पण विष्णू विनोदनं ठोकले १४ सिक्स; ऋतुराज गायकवाडच्या पंक्तीत मिळवलं स्थान

Ambegaon News : स्वातंत्र्यपूर्व परंपरेचा जिवंत वारसा; वर्षातून एकदाच भरणारा वळतीचा शिळा बाजार!

SCROLL FOR NEXT