corona1 
पुणे

दौंडमधील पाटसचे टेन्शन वाढले, कुरकुंभ परिसराला दिलासा 

सकाळवृत्तसेवा

पुणे : दौंड तालुक्यातील पाटस येथे कोरोनाचे तीन रुग्ण सापडले, तर कुरकुंभ परिसरातील 13 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 

पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथे तीन दिवसांपूर्वी कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्या एका जेष्ठ नागरिकाच्या घरातील तीन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीची पत्नी, गर्भवती मुलगी व जावई यांचा समावेश आहे, अशी माहिती वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराणी पांचाळ यांनी दिली.

पाटस येथील एका जेष्ठ व्यक्तीचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याच्या दिवशी गावातील आणखी एक 45 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली. त्यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने मृत्यू झालेल्या जेष्ठ व्यक्तीच्या व संबधित कोरोनाबाधित महिलेच्या घरातील व संपर्कात येणाऱ्या 20 जणांना कोरोनाच्या तपासणीसाठी पाठवून देण्यात आले होते. आज दुपारी चार वाजता अहवाल प्राप्त झाले. त्यानुसार मयत व्यक्तीच्या घरातील तीन जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले. यामध्ये पत्नी, मुलगी व जावई यांचा समावेश आहे. मुलगी गर्भवती असल्याचे आरोग्य सेवक भीमराव बडे यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, गावात एकाच दिवशी तीन कोरोना रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तीन दिवसापूर्वी कोरोना संसर्गाने व्यक्तीचा मृत्यू झाला नंतर गावातील काही भाग सील करण्यात आला आहे. तसेच, वरवंड येथेही तीन दिवसांपूर्वी एका वस्तीवरील कुटुंबात बाहेरून आलेल्या जावयाला कोरोना संसर्ग झाल्याचे वैद्यकीय निष्पन्न झाले. त्या कुटुंबातील व्यक्तींना कोरोनाच्या तपासणीसाठी पाठवून देण्यात आले आहे. त्यांच्या अहवालाकडे आरोग्य विभाग व ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील पांढरेवाडी हद्दीतील झगडेवस्ती येथील कोरोनाबाधित दांम्पत्याच्या संपर्कात आलेल्या 13 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पाखरे यांनी दिली. 

कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत नोकरीनिमित्त पांढरेवाडी हद्दीतील झगडेवस्ती येथे आलेले इंदापूर तालुक्यातील दांपत्यास कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्कात आलेल्या 13 जणांचे घशातील नमुने तपासणीसाठी स्वामी चिंचोली कोविड सेंटरमध्ये देण्यात आले होते. या सर्वांचा कोरोना अहवाल आज प्राप्त झाला असून, तेराही जणांचे अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे कुरकुंभ, पांढरेवाडी परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. कोरोनाबाधित रूग्ण आढळून आलेल्या परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांनी शासनाने कोरोनासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस पाटील विलास येचकर यांनी केले आहे. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : अल्पवयीन मुली बेपत्ता प्रकरणे वाढली; मानवी तस्करी रोखण्यासाठी संसदेत आवाज

IPL 2026 Marathi News: मी माफी मागतो...! इंग्लंडच्या स्टार फलंदाजाची आयत्यावेळी माघार, हॅरी ब्रूकनंतर त्याच्यावरही होणार बंदीची कारवाई

Pune News : ‘पीटीपी’ अ‍ॅपमुळे वाहतूक शिस्तीत सुधारणा; अडीच लाख तक्रारींवर ९.३२ कोटींचा दंड

Latest Marathi News Live Update : खरातप्रकरणी तपासामध्ये काही प्राण्यांचे अवयव मिळून आले- पीडितेचे वकील

Solapur News : सावळेश्वर टोल नाक्यावर चालकाला बेदम मारहाण; वाहतूक ठप्प, तणावाचे वातावरण

SCROLL FOR NEXT