पुणे

Corona Virus : पुण्यात आढळले कोरोनाचे 3 नवीन रुग्ण: 2 रुग्ण गंभीर 

सकाळवृत्तसेवा

Fight With Coronavirus :पुणे : कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रुग्णांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावरखासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरात गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोरोनाचे 19 रुग्ण आढळले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे
41 वर्षांची महिला आणि एक तरुण यांना न्यूमोनिया झाला होता. वेगवेगळ्या वैद्यकीय चाचण्या करूनही त्याचे अचूक रोगनिदान होत नव्हते. त्यामुळे या दोन्ही रुग्णांचे घशातील द्रव पदार्थाचे नमुने तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले. त्या वेळी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले. यातील 41 वर्षी महिलेला करोनाचा संसर्ग झाल्याचे शुक्रवारी (ता. 20) झाले होते.  त्यापाठोपाठ आता दुसरा रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. त्या रुग्णाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे सोमवारी (ता. 23) निदान झाले. 


Coronavirus : कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण...

तीन नवीन रुग्ण
शहारात गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाचे तीन नवीन रुग्ण आढळले असून, या रुग्णांची संख्या आता 19 झाली आहे. महापालिकेच्या नायडू रुग्णालयात आतापर्यंत 560 जणांना दाखल करण्यात आले. या सर्वांचे नमुने तपासण्यासाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले. दाखल केलेल्या 560 पैकी 496 जणांना कोरोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या सर्वांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यापैकी 19 रुग्णांना संसर्ग झाला आहे. उर्वरित 45 नमुन्यांचा प्रयोगशाळा अहवाल अद्यपा प्रतीक्षेत असल्याची माहिती महा पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

Coronavirus : कोरोना व्हायरसची लक्षणे दिसताहेत? घाबरू नका पण...

दाखल रुग्ण 560
तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविलेले नमुने 560
निगेटिव्ह 496
पॉझिटिव्ह 19
प्रलिंबित 45
अत्यवस्थ रुग्ण 2

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Chairman Election : महायुतीच्या नेत्यांची आज गोव्यात बैठक; गोकुळ अध्यक्ष निवडीबाबत होणार चर्चा, सतेज पाटलांनी मुश्रीफ, कोरे, नरकेंकडे काय केली विनंती?

पुणे पदवीधरमध्ये हर्षदा देशमुख आघाडीवर, तर शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदारांना धक्का; कुणाला किती मतं?

Hardik Pandya Trade Speculation: नाद नाय करायचा.. हार्दिकसाठी एक नव्हे सहा फ्रँचायझी मैदानावर! शिवम, रिंकू, यशस्वी, इशान यांना ट्रेड करायला तयार... मोठ्या हालचाली

Marathi News Live Updates : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या महाभियोगाच्या मागणीवरून राम कदम यांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Pune Teachers Constituency : अभिजीत बिचुकले यांना मोठा धक्का! पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा पराभव; फक्त १९ मते मिळाली

SCROLL FOR NEXT