corona logo 
पुणे

वेल्ह्यामागची कोरोनाची साडेसाती हटेना, आणखी तिघांना लागण 

मनोज कुंभार

वेल्हे (पुणे) : वेल्हे तालुक्‍यातील वडगाव झांजे परिसरात आणखी तीन जणांना कोरोनाची बाधा झाली असून, येथील कोरोनाबाधितांची एकूण संख्या सहावर पोचली असल्याची माहिती प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली.

वडगाव झांजे परिसरात कोरोनाचा प्रभाव वाढत असून, येथील संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. आज (ता. 13) आणखी तीन जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. या परिसरात एकूण कोरोना बाधितांची संख्या आठ झाली असली, तरी दोन रुग्ण हे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील आहेत. त्यामुळे वडगाव झांजे परिसरात एकूण कोरोनाबाधितांची संख्या सहावर पोचली आहे अजून 19 जणांची तपासणी अहवाल येणे बाकी आहे. या परिसरातील लोकांची नियमित तपासणी सुरू असून, गावागावांमध्ये औषध फवारणी सुरू असल्याची माहिती तहसीलदार शिवाजी शिंदे व गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांनी दिली. 

वडगाव झांजे परिसरास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज (ता. 13) भेट दिली व येथील परिस्थितीचा आढावा घेतला. येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांनी विविध सूचना दिल्या. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, प्रांताधिकारी राजेंद्र जाधव,तहसीलदार शिवाजी शिंदे,गटविकास अधिकारी विशाल शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी सुदर्शन मलाजुरे, जिल्हा परिषद सदस्य दिनकर धरपाळे, सभापती दिनकर सरपाले आदी आदी उपस्थित होते. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

वेल्हे तालुक्‍यात आतापर्यंत कोरोनाचे पंधरा रुग्ण आढळले आहेत. त्यातील एकाचा मृत्यू झाला असून, आठ जणांनी कोरोनावर मात केलेली आहे. सध्या सहा जण कोरोनाबाधित आहेत. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : IIT मुंबईतील विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर संताप; मुख्य गेटबाहेर दिवे लावून आंदोलन

Kannad Rainfall: दीड महिन्यापासून पावसाची दडी; कन्नडमध्ये मका, सोयाबीन, कपाशी कोमेजली, शेतकरी संकटात

SCROLL FOR NEXT