bhugav
bhugav 
पुणे

मुळशीतील तिघे कोरोनामुक्त, मात्र, आणखी... 

गोरख माझीरे

कोळवण (पुणे) : मुळशी तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या भूगाव येथे एकाच कुटुंबातील वडील व दोन मुलांना कोरोनाची लागण झाली होती. हे तीनही कोरोना रुग्ण बरे होऊन आज सुखरूप घरी परतले. तर, सणसवस्ती येथे आणखी एका पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. 

आज सापडलेली कोरोनाबाधित व्यक्ती भूगावच्या सणसवस्ती येथील सोसायटीत राहत असून, मूळची माळेगाव (ता. मुळशी) येथील आहे. तिला त्रास होऊ लागल्याने येथील रूग्णालयात कोरोनाची तपासणी केली. त्यात कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या घरातील पत्नी व दोन मुले असून, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, त्यांना घरीच क्वारंटाइन केले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी अजित करंजकर यांनी दिली. रुग्ण राहत असलेला भाग सील करण्यात आला आहे. 

दरम्यान, भूगाव येथे सुरवातीला आढळलेले तीनही रुग्ण बरे झाले. ते आज सुखरूप घरी परतले. या वेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, सोसायटीमधील सर्व सभासदांनी त्यांचे टाळ्या वाजवून फुलांची उधळण करून पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

एकाच कुटुंबातील सर्व व्यक्तींनी अत्यंत कमी कालावधीत या तिघांनी निर्भीडपणे कोरोनावर मात केली. सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करत त्यांना गहिवरून आले. तसेच सोसायटीमधील इतर सदस्यांनी या कालावधीत घेतलेल्या काळजीबद्दल त्यांना दिलेल्या सोयीबद्दल त्यांनीही ग्रामपंचायतीचे आभार मानले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT