suicide 
पुणे

पोलिस ठाण्यातच तीन आरोपींचा आत्महत्येचा प्रयत्न 

नितीन बारवकर

शिरूर (पुणे) : दरोड्याच्या गुन्ह्यात शिरूर पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तिघा संशयित आरोपींनी आज दुपारी पोलिसांचा डोळा चुकवून "रोगर' हे विषारी तणनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. 

मिथुन ऊर्फ अमोल आनंदा चौगुले (वय 23), योगेश केशव मचाले (वय 24) आणि वैभव ऊर्फ दादा बाळासाहेब आरवडे (वय 19, तिघेही रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर) अशी विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या संशयितांची नावे असून, त्यांच्याविरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे शिरूरचे पोलिस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमोणे (ता. शिरूर) येथील भरत भाऊसाहेब काळे यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्याकडील दहा लाख रुपयांची रक्कम जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी शिरूर पोलिस पथक व पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे अन्वेषणच्या पथकाने चौगुले, मचाले व आरवडे यांच्यासह रोहित प्रमोद कर्डिले (रा. निमोणे), मीनानाथ विलास गव्हाणे (रा. मांडवगण); तसेच फिर्यादी काळे यांच्या नात्यातील अक्षय नानासाहेब काळे व दत्तात्रेय ऊर्फ पप्पू नानासाहेब काळे (रा. निमोणे) यांना 11 डिसेंबरला अटक केली होती. हे सर्व संशयित शिरूर पोलिसांच्या कोठडीत होते.

आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी चौगुले, मचाले व आरवडे यांना तपासासाठी कोठडीतून तपास पथकाच्या कक्षात नेले. तेथे बराच वेळ त्यांची कसून चौकशी केली. त्या वेळी त्यांनी पोलिसांचा डोळा चुकवून "रोगर' हे विषारी औषध पिले. पोलिसांनी तातडीने त्यांना येथील खासगी रुग्णालयात हलविले. तेथे त्यांच्यावर उपचार चालू आहेत. त्यांच्या जीवितावरील धोका टळला आहे.

दरम्यान, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सचिन बारी यांनी शिरूर पोलिस ठाण्यात भेट दिली. 

तपासावेळी तणनाशक आले कोठून? 
दरोड्यातील आरोपींची पोलिसांच्या स्वतंत्र कक्षात चौकशी करत असताना तेथे तणनाशकाची बाटली पोचलीच कशी? याबाबत चर्चांना उधाण आले होते. या संशयितांना भेटण्यासाठी आलेल्यांपैकी कुणीतरी त्यांना ती बाटली दिली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam: श्री छत्रपती शिवाजी महाराज जलसागर, कोयना जलाशयाला मिळालं नवं नाव; शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण!

Pune Municipal Election : मतांसाठी अखंड धावपळ; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उमेदवार-कार्यकर्त्यांना घाम

Maharashtra Weather : राज्यात 'उकाडा' जाणवू लागला, किमान तापमानात वाढ, पण लवकरच थंडी परतणार

शैक्षणिक गरज

ZP Election : जिल्हा परिषद निवडणुकीत चिन्ह आरक्षित करायचंय? उद्यापर्यंत अर्ज करा

SCROLL FOR NEXT