Education-in-Home
Education-in-Home 
पुणे

'स्क्रीनशिवाय घरच्या घरी शिक्षण' उपक्रमात तीन हजार विद्यार्थी सहभागी

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या संकट काळात लाखो विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. अशा पद्धतीने शिक्षण घ्यायचे म्हटलं की 'स्क्रिन'शिवाय पर्याय (अर्थातच मोबाईल, लॅपटॉप याची स्क्रीन) पण 'स्क्रीन'च नसेल तर...? मुलांचा अभ्यास कसा होणार? मुले शिकणार कशी? असे असंख्य प्रश्न पडतात. याच प्रश्नावर स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठानने 'स्क्रीनशिवाय शिक्षण' या उपक्रमाद्वारे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

उपक्रमात महत्वपूर्ण भूमिका बजावली ती उपक्रम-पुस्तिकांनी. घरातील प्रत्येक गोष्टींमधून मूल काय-काय शिकू शकतात. घरात बसून मनोरंजन आणि शिक्षण या दोहोंची सांगड कशी घालता येईल, त्याकरिता साधे सोपे उपक्रम म्हणून प्रतिष्ठानने उपक्रम पुस्तिका तयार केली आहे. गरजु विद्यार्थ्यांना ही पुस्तिका देण्यात आली आहेत. 'स्क्रीनशिवाय घरच्या घरी शिक्षण हा उपक्रम सिंहगड रस्ता, कोथरूड, विद्यापीठ भाग, कसबा भाग, व शहराबाहेरील सहा ठिकाणी सुरू आहे. जवळपास ७० वस्त्यांमधील सुमारे तीन हजार  मुलांपर्यंत पोचला आहे. एकूण ७० विद्यार्थी मित्र,  ७०शिक्षक व आठ अन्य सहयोगी सेवा संस्थादेखील या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. इयत्ता पहिली-दूसरी, तिसरी-चौथी-पाचवी आणि सहावी-सातवी असे मुलांच्या इयत्तांनुसार तीन गट केले असून त्याप्रमाणे उपक्रम-पुस्तिकांची रचना केली आहे. भाषा, गणित, विज्ञान या विषयामधील मूलभूत संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होऊ शकेल असे साहित्य पुस्तिकेत समाविष्ट केले गेले, अशी माहिती प्रतिष्ठानच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य महेंद्र वाघ यांनी दिली.

'मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही पुस्तिका महत्वाचा आहे. यातील उपक्रमांमुळे माझ्या मुलीमधील कला गुणांना वाव मिळतो आणि अभ्यासाची गोडी निर्माण होत आहे. यातून भाषिक, वाचिक कायिक या गोष्टींचा विकास होण्यास मदत होत आहे."
- विनय शाळीग्राम, पालक, दांगट नगर वस्ती

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणावर रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT