पुणे

पुणे-सोलापूर हायवेवरील लाॅजवर छापा टाकून तीन महिलांची सुटका 

सकाळवृत्तसेवा

यवत : बोरीभडक (ता. दौंड) येथील त्रिमूर्ती लॉजवर वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याची माहिती दौंडच्या उपविभागीय पोलिस कार्यालयास मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने यवत पोलिसांच्या मदतीने या लॉजवर छापा टाकून तीन महिलांची सुटका केली. याप्रकरणी तिघांवर यवत पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यवत पोलिस ठाण्याच्या हद्दीत महामार्गालगत अनेक लॉजवर वेश्‍या व्यवसाय चालत असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. बोरीभडक गावच्या हद्दीतील चंदवाडी येथील त्रिमूर्ती लॉजची चर्चाही अनेक दिवसांपासून सुरू होती. दौंड उपविभागीय पोलिस कार्यालयास याबाबतची माहिती मिळताच त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्या ठिकाणी तीन महिलांकडून वेश्‍या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे निदर्शनास आले. या पैकी दोन महिला पश्‍चिम बंगालच्या आहेत. पोलिसांनी या महिलांची सुटका केली आहे. 

पोलिस नाईक कमलेश शिवाजी होले यांनी याबाबत फिर्याद दिली. प्रभाकर गोपाळ शेट्टी (वय 46), नवीन सीनसलीयन (वय 35, दोघेही रा. त्रिमूर्ती लॉज, मूळ रा. उडपी कर्नाटक) व महंमद फारुक अन्सारी (वय 20, रा. त्रिमूर्ती लॉज, मूळ रा. झारखंड), या तिघांवर अनैतिक व्यापार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात गैरहिंदू ठेकेदारांना कामे देऊ नका; भाजप गटनेत्याच्या पत्राने खळबळ

SCROLL FOR NEXT