pune.jpg
pune.jpg 
पुणे

पुणे : पाण्याच्या टाकीत बुडुन चिमुकल्याचा मृत्यू

पांडुरंग सरोदे

पुणे : रमझान सणाच्या खरेदीसाठी आई-वडील बाहेर गेले असताना नातेवाइकांकडे सांभाळण्यासाठी ठेवलेला तीन वर्षांच्या मुलाला घरासमोर खेळताना शेजारील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावरील पाण्याच्या टाकीत पडल्याने आपल्याला जीव गमवावा लागला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी कात्रजमधील भिलारेवाडी येथे घडली. अवघ्या पंधरा दिवसांमध्येच अनधिकृत बांधकामांमुळे लहान मुलांचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. 

पिल्लू उर्फ समर सुलतान शेख (वय तीन वर्षे, रा. भिलारेडवाडी, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी मुलाचे वडील सुलतान शेख (वय 28) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून बांधकाम व्यावसायिक अनिल ज्ञानदेव खोपडे याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सहाय्यक पोलिस निरीक्षक एस.आर.चिवडशेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रमझानचा सण असल्यामुळे फिर्यादी व त्यांच्या पत्नी मंगळवारी खरेदी करण्यासाठी लष्कर परिसरात आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा समर यास त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या फिर्यादीच्या पत्नीच्या मावशीकडे सांभाळण्यासाठी ठेवले होते.
 

दरम्यान, सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास समर घरासमोर खेळता-खेळता शेजारीच खोपडे याच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर गेला. तळमजल्यावरच इमारतीला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी उघड्या अवस्थेत होते. त्यातच तेथे अंधार असल्याने समर पाण्याच्या टाकीत पडला. फिर्यादीच्या नातेवाईक समरला पाहण्यासाठी घराबाहेर आल्या, त्यावेळी तो दिसला नाही. त्यामुळे त्यांनी तत्काळ शेजारील पाण्याच्या टाकीकडे धाव घेतली. त्यावेळी समर पाण्यात बुडाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. अन्य रहिवाशांच्या मदतीने त्यास पाण्याबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT