Pune Accident Esakal
पुणे

Pune Accident: किंचाळण्याचा एकच कल्लोळ अपघातात जखमी महिलेने सांगितला थरारक अनुभव

ट्रक बसवर आदळल्याने झालेल्या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 22 जण जखमी झाले

अंकिता खाणे (Ankita Khane)

‘‘सासऱ्यांची तब्येत बरी नसल्याने मी आणि माझे पती दोघेही त्यांना भेटण्यासाठी इस्लामपूरला गेलो होतो. त्यांची विचारपूस करून आम्ही पुन्हा मुंबईला जाण्यासाठी निघालो. परत येताना आमचाही अपघात झाला. मागून भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने बस तीन-चार वेळा पलटी झाली. बसमध्ये किंचाळण्याचा, रडण्याचा, ओरडण्याचा एकच कल्लोळ उडाला होता,’’ अपघातात जखमी झालेल्या संगीता जाधव ‘सकाळ’शी बोलत होत्या. त्यांचे पती नितीन जाधव हेसुद्धा अपघातात जखमी झाले आहेत.

जाधव म्हणाल्या, ‘‘इस्लामपूरवरून आम्ही बसने रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने रवाना झालो. त्यानंतर साधारण साडेअकराच्या सुमारास जेवणासाठी बस साताऱ्यानजीक एका हॉटेलजवळ थांबली, परंतु आम्ही घरीच जेवलो होतो म्हणून खाली उतरलो नाही. आम्ही अर्धवट झोपेत होतो. साधारण अडीच तासांनंतर बस नवले पुलाजवळील स्वामिनारायण मंदिराजवळ आली. त्यावेळी अचानक भरधाव आलेला ट्रक आमच्या बसला धडक देऊन बाजूच्या टेकडीला धडकला. त्या वेळी संपूर्ण परिसरात अंधार होता. कुठल्या प्रकारची हालचाल करण्यास काही मार्ग नव्हता.’’

अपघाताची प्रमुख कारणे

तीव्र उतार असल्याने अवजड वाहनांना अचानक ब्रेक लावणे कठीण

काही ठिकाणी सेवा रस्ते नाहीत, त्यामुळे स्थानिक वाहनचालक राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करतात.

अवजड वाहनचालक इंधन वाचविण्यासाठी उतारावर वाहने ‘न्यूट्रल’ करतात, त्यामुळे वाहनांवरील ताबा सुटतो.

बसची काच फोडून काढले बाहेर

‘‘अपघातात कुणाला काय लागले किंवा कुणाचे काय झाले हेदेखील समजणे अवघड होते. त्याचवेळी बसची काच फोडून मला बाहेर काढण्यात आले. मी मदत करणाऱ्या लोकांना विचारले की माझे पती कुठे आहेत. माझ्या पतीचा मला आवाज येतो आहे, त्यांना कोणीतरी वाचवा हो. त्यानंतर नागरिकांनी बसचा पत्रा कापून माझ्या पतीला बाहेर काढले. रुग्णवाहिकेमधून आम्हाला चव्हाण हॉस्पिटलमध्ये दाखल केले.’’ हा थरार सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले. तर, अपघातातून बचावल्याचे समाधानही त्यांच्या चेहऱ्यावर होते.

अपघाताची कारणे शोधण्यासाठी चौकशी समिती

स्वामि नारायण मंदिराजवळ झालेल्या अपघाताची चौकशी करण्यासाठी वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने घटनेचा अभ्यास करून सात दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

या समितीमध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता हे सदस्य तर, प्रादेशिक परिवहन अधिकारी हे सदस्य सचिव असतील. या ठिकाणांच्या अपघातांबाबत सेव्ह लाइफ फाउंडेशन या संस्थेने केलेल्या उपाययोजनांचा अहवालात अंतर्भाव असावा, असेही डॉ. देशमुख यांनी आदेशात म्हटले आहे.डॉ. देशमुख म्हणाले की, रस्ते सुरक्षा समितीच्या माध्यमातून नवले पुलाजवळ होत असलेल्या अपघातांबाबत आढावा घेतला आहे. दरम्यान, डॉ. देशमुख यांनी जखमींची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Petrol Pump: पुण्यात सातनंतर पेट्रोलपंप सुरु राहणार का? संध्याकाळी काय निघाला तोडगा?

Pachod Crime : पाच लाखासाठी मुकादमाकडून ऊसतोड कामगाराचे अपहरण; पाचोड येथे गुन्हा

Pregnant Woman and Traffic Police Viral Video : भररस्त्यात प्रेग्नंट महिला ओरडत होती, पण तरीही वाहतूक पोलिस स्कूटी चालवतच राहिला, नक्की काय घडलं?

Viral Video Tractor : नाद केला पण वाया नाही गेला, ट्रॅक्टरवाल्या भावाने स्पिकरवर फॉरेनर नाचवल्या; 'चुनरी चुनरी' चा इन्स्टावर व्हिडीओ व्हायरल

Latest Marathi Breaking News Live Update: सांगरूळ बंधाऱ्यामध्ये कुंभी नदीपात्रात कोंबड्यांचे वेस्टेज

SCROLL FOR NEXT