pune police 
पुणे

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभुमीवर पुण्यात रविवारी कडक पोलिस बंदोबस्त

शरयू काकडे

पुणे : शहरामध्ये स्वातंत्र्यदिनी कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

विधानभवनाच्या प्रारंगणामध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या हस्ते रविवारी सकाळी ध्वजरोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. पोलिस मुख्यालयातही विशेष पोलिस संचलन होणार आहे. याबरोबरच निरनिराळ्या संस्था, संघटनांतर्फेही ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. या पार्श्‍वभुमीवर शहरातील सर्व पोलीस ठाण्यांसह शहर गुन्हे अन्वेषण विभाग, विशेष शाखा, वाहतूक नियंत्रण विभागाबरोबरच राज्य राखीव पोलीस दलाची पथके विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.

विशेषतः स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर काही दहशतवादी संघटना घातपात घडवण्याची शक्‍यता असल्याने सतर्कता बाळगण्याबाबत मागील आठवड्यात गुप्तचर विभागाने सुचित केली आहे. त्यादृष्टीने प्रामुख्याने मोठ्या शहरांमध्ये पुरेशी खबरदारी घेण्याच्या सूचना गृह मंत्रालयाने दिल्या आहेत. त्यामुळे शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जातीय, धार्मिकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला वाहन तपासणी, हॉटेल्स, लॉजची तपासणीही पोलिसांकडून घेतली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT