Pooja_Chavan 
पुणे

पूजा चव्हाण प्रकरण : भाजप आणि लीगल जस्टीसचे दोन्ही खटले कोर्टाने फेटाळले

सकाळ वृत्तसेवा

Pooja Chavan Suicide case: पुणे : टिकटॉक स्टार पूजा चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणाची वानवडी पोलिसांनी चौकशी करावी. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, यासाठी दाखल झालेले दोन्ही खटले न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग हे गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नाहीत, असे नमूद करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी रोहिणी पाटील यांनी हे खटले फेटाळले.

भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडीच्या अध्यक्षा ॲड. ईशाना जोशी आणि लीगल जस्टिस सोसायटीतर्फे ॲड. भक्ती पांढरे यांनी खटला दाखल करण्यासाठी अर्ज केले होते. त्यानुसार या प्रकरणात दोन खासगी दावे देखील झाले होते. या प्रकरणात राजकीय व्यक्तीचा सहभाग आहे. त्यामुळे अद्याप या घटनेची सखोल चौकशी झालेली नाही. या प्रकरणात कोणाचा हात नाही, असे पोलिसही स्पष्ट करीत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास व्हावा. त्यानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश न्यायालयाने पोलिसांना करावेत, यासाठी हे दावे दाखल करण्यात आले होते.

पूजा यांच्या आत्महत्येनंतर माजीमंत्री संजय राठोड यांच्यासोबतचे त्यांचे फोटो आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. त्यात असलेल्या संभाषणावरून तसेच त्यांच्यातील संबंधाबाबत असलेल्या चर्चेवरून हे प्रकरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

समाज माध्यमावर उपलब्ध असलेले फोटो आणि व्हायरल झालेले कॉल रेकॉर्डिंग यावरून गुन्हा दाखल करण्यासाठी सक्षम पुरावे नाहीत. पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. त्याचा तपास अद्याप सुरू आहे, असे न्यायालयाने नमूद केले आहे.

गुन्हा दाखल होण्यासाठी आम्ही पोलिसांत तक्रारअर्ज केला होता. त्याची पोहच पावती न्यायालयात दाखल केली आहे. मात्र पोलिसांना त्याची दखल घेतली नव्हती. न्यायालयाने दिलेल्या या निकालाच्या विरोधात आम्ही सत्र न्यायलयात दाद मागणार आहोत.
- ॲड. ईशाना जोशी, अध्यक्षा, भारतीय जनता पार्टीच्या वकील आघाडी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st Test Day 2 Live: रोहित शर्मानंतर क्रिकेट इतिहासात ग्लेन फिलिप्सने 'अविश्वसनीय' पराक्रम केला; शतक ठोकले, निकोल्ससह अनेक विक्रमही मोडले...

IND vs NZ 1st Test Day 2 Live: ग्लेन फिलिप्सच्या मानेवर चेंडू जोरात आदळला! बॅट फेकली, हेल्मेट फेकलं... भारतीय खेळाडूने टशनने पाहिलं; जबरदस्त ड्रामा

SuryaKumar Yadav Post: सूर्यकुमारची रात्री सोशल मीडियावर पोस्ट! जय शाह, रोहित शर्मा, गौतम गंभीर यांचे मानले आभार; नेमकं काय म्हणाला?

Shirur Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाने घरावर छापा टाकून विदेशी दारूचा लाखो रुपयाचा साठा केला जप्त

HSC Economic Paper : बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरच्या वेळापत्रकात अंशतः बदल

SCROLL FOR NEXT