Bus-Stop 
पुणे

पुण्यात मद्यपींच्या त्रासामुळे बस स्टॉपच काढून टाकण्याची वेळ

समाधान काटे

शिवाजीनगर - मद्यपींच्या त्रासामुळे पुण्यात पीएमपीएलचा बस स्टॉप काढून टाकण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस थांबा उभारण्यात आला होता. मात्र मद्यपींचा अड्डा झाल्यानं प्रशासनाला अखेर स्टॉप काढून टाकावा लागला. पांडवनग पौलिस चौकीच्या मागे हा पीएमपीएल बस स्टॉप होता. या परिसरात दोन शाळा आहेत. शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बस थांबा उभारला होता. 

बस थांब्याचा वापर प्रवाशी, विद्यार्थी न करता मद्यापींचा अड्डा झाला होता. वडारवाडी, पांडवनगर परिसरात अवैधरित्या दारू गुत्ते चालवले जातात. पोलिस कारवाई चार दिवस केली जाते मात्र चार दिवसांनंतर पुन्हा 'जैसे थे' दिवस पाहायला मिळतात. कायम स्वरूपी कारवाई होताना दिसत नाही. थांब्यावर मद्यपान करून येणाऱ्या- जाणाऱ्या महिलांची, मुलींची छेडछाड काढण्याचे प्रकार अनेकवेळा या ठिकाणी घडले आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरात कित्येक ठिकाणी बसथांबे बसवावेत म्हणून मागणी केली जाते,मात्र मद्यापींच्या त्रासाला कंटाळून पांडवनगर पोलिस चौकीच्या मागे असलेला बसथांबा काढण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी आमदार, महापौर, पोलिसांकडे केली होती. नागरिकांच्या मागणीचा विचार करून अखेर तो बस थांबा प्रशासनाला काढावा लागला.

'बाजुला पोलिस चौकी, महापालिकेच्या दोन शाळा असून देखील.बस थांब्यावर तयार  दारूचा अड्डा तयार झाला होता.नागरिकांच्या मागणीमुळे तो काढावा लागला.त्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवले तर छेडछाडीचे प्रमाण थांबेल".
- रमेश भंडारी स्थानिक नागरिक.

'सी.सी.टी.व्ही बसवण्यासाठी नगरसेवकांचे सहकार्य घेतले जाईल.अवैद्य दारुचे गुत्ते असतील तर त्यावर कारवाई केली जाईल".
- अनिल शेवाळे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चतुर्श्रुंगी पोलिस ठाणे

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola Nazul Plot Action : मनपाच्या कारवाईला स्थगितीची मागणी ; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आयुक्तांना निर्देश नजूल भूखंडावरील रहिवासी, व्यावसायिकांना दिलासा; दोन्ही बाजू ऐकून घेण्याची शिवसेनेची मागणी

Madhya Pradesh: वर्षभरात ८५ हजार तरुणांना रोजगाराच्या संधी; ६२ खनिज निरीक्षकांना नियुक्तीपत्रे

'हे काय चाललंय आयुष्यात...' जितेंद्र जोशींनी नम्रता शिरोडकरबरोबरच्या कामाचा सांगितला अनुभव, म्हणाले, 'एक वेगळच दडपण...'

Latest Marathi News Live Update : पुण्यातील उद्योजक सचिन लोणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; हल्ल्यानंतर घटनास्थळावरून आरोपी फरार

IND vs SL Semi Final : झाला हो गाजावाजा,पण...! भारताची आघाडीची फळी ढेपाळली; वैभव सूर्यवंशी ठिक खेळला, संजू-अभिषेक फेल

SCROLL FOR NEXT