vegare
vegare 
पुणे

पोटातच बाळ मरण पावलेल्या महिलेसाठी अँब्यूलन्स चालक ठरला देवदूत  

धोंडिबा कुंभार

पिरंगुट (पुणे) : पोटातच बाळा मेल्यामुळे बेशुद्ध झालेल्या महिलेवर रवी तारू या अॅम्ब्यूलन्स चालक देवासारखा धावून आल्यामुळे वेळेवर उपचार झाले.  

मुळशी तालुक्याच्या मुठा खोऱ्यातील दुर्गम व डोंगरी भागातील मांडवखडक येथील वस्तीवर एक गरोदर महिला प्रसूतीच्या वेदनेने विव्हळत होती. रात्रीच्यावेळी बाळ पोटातच मरण पावल्याने ती बेशुद्ध झाली...त्यात वादळाने विजेअभावी फोन बंद होते...प्राथमिक आरोग्य केंद्र सुमारे तीस किलोमीटरवर... त्यात अठरा किलोमीटरचा रस्ता माती, मुरुम, दगडधोंड्यांचा, कच्चा...पावसाची रिमझिम ...अवघी वस्ती हतबल आणि चिंताग्रस्त ...अशातच रवी तारू हे अॅम्ब्यूलन्स चालक देवासारखा धावून आला. भौगोलिक, आर्थिक, वैद्यकीय अडथळ्यांची शर्यत पार पाडीत ही महिला तब्बल आठ दिवसानंतर शुद्धीवर आली आणि उपचारानंतर सुखरूप झाली. 

मुळशी तालुक्यातील मुठा खोऱ्य़ातील मांडवखडक हा वेगरे गावचाच भाग आहे. येथे मुठा नदीचा उगम होतो, असा दुर्गम परिसर आहे. तेथील एका महिलेला रात्रीच्यावेळी तात्काळ दवाखान्यात आणणे शक्य नव्हते. त्यामुळे कुटुंबियांच्या मदतीने रात्री तेथील दाईने (सुईनीने) तिच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु दुर्दैवाने बाळ पोटातच दगावले व महिला बेशुद्ध झाली. 

दरम्यान, सकाळी मुठा आरोग्य केंद्राशी संपर्क साधला असता अॅब्यूलन्स चालक रवी तारू यांनी प्रसंगावधान ओळखून व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आरोग्य सेवक मखरे व नर्स पवार यांना सोबत घेऊन कच्च्या मुरमाच्या रस्त्याने चिखलातून धाडस व कौशल्याने अनेक अडथळ्याच्या शर्यती पार करीत मांडवखडक गाठले. बेशुद्ध अवस्थेतील त्या महिलेला मुठा, पिरंगुट, लवळे असा हॉस्पिटलचा प्रवास करीत शेवटी ससूनला दाखल केले. आठ दिवसांनी ही महिला शुद्धीवर आली असून, ती सुखरूप घरी परतली आहे.

दरम्यान, मुठा येथील ग्रामस्थांच्यावतीने रवी तारु यांचा पुणे शहर ग्राहक समितीचे अध्यक्ष सुरेश मोहोळ व मामासाहेब मोहोळ कुस्ती महासंघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोहोळ यांच्या हस्ते मानाचा फेटा, शाल, श्रीफळ व रोख पाच हजार रुपये देऊन सत्कार केला . 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT