Tips While Ordering food online during corona pandemic
Tips While Ordering food online during corona pandemic 
पुणे

ऑनलाईन जेवण मागवताय? सावधान : 'अशी'' घ्या काळजी

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना व्हायसरमुळे लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन फुड, किराना सामान, भाजीपाला डिलिव्हरी सर्व्हिसेस सध्या सर्वांसाठीच महत्वाचे ठरतं आहेत. लॉकडाऊन शिथिल झाला असला तरी, अद्याप काही नागरिक बाहेर जाणे टाळत असून, घरपोहच सामान, फुड देणाऱ्या सर्विसेसला प्राधान्य देत आहेत. सोशल डिस्टंसिग टाळण्यासाठी नागरिक घरपोहच किराना, सामान, फुड , फळे - भाजीपाला मागवितात, पण यामुळे कोरोना व्हायसर पसरण्याचा धोका नाकारता येत नाही. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात मुंबई आणि पुणे या महानगरांमध्येच सध्या सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. पुण्यात सध्या लॉकडाउन शिथिल करण्यात आलाय. हॉटेल्समधून केवळ पार्सल सुविधा सुरू करण्यात आलीय. ऍप्सच्या माध्यमातून, वेबसाईटवरून किंवा फोनवरून तुम्हाला हवं ते जेवण मागवता येतंय. तसंच तुमच्या आवडत्या हॉटेलच्या बाहेर तुम्हाला पार्सल मिळण्याचीही सुविधा सुरू झालीय. पण, हे सगळं असताना कोरोनाची भिती कमी झालेली नाही. ती कायम असल्यामुळं तुम्हाला काळजी घ्यावीच लागणार आहे. 

ळात कोरोना व्हायरसवर अद्याप लस निर्माण झालेली नसून सोशल डिस्टंसिंग पाळणे हा एकच योग्य पर्याय सध्या उपलब्ध आहे. सोशल डिस्टिंसिंग टाळण्यासाठी ऑनलाईन डिलिव्हरी हा पर्याय योग्य ठरत असला तरी योग्य काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. डिलिव्हरी सामान घेताना, पैसे देताना बाहेरुन येणाऱ्या वस्तुंच्या, अथवा व्यक्तींच्या संपर्कांत येतात, अशा वेळी योग्य काळजी न घेतल्यास कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. सरकाराने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार डिलिव्हरी सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. संबधित कंपन्या गाईडलाईन्सचे काटेकोर पालन करत असल्या तरी नागरिकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. 

पुणे : पतीने गळफास घेतलेला पाहून पत्नीनेही...

फुड, सामान डिलव्हरी घेताना काय काळजी घ्यावी?
-  नेहमी डिलव्हिरी घेताना डिलिव्हरी बॉय/ व्यक्तीसोबत सुरक्षित अंतर ठेवून सामान घ्यावे.
- पैसे देताना ऑनलाईन पेमंटचा वापर करावा, कॅश ऑन डिलिव्हरी शक्यतो टाळावे.
-  डिलिव्हरी बॉय/ व्यक्तीसोबत फुड डिलिव्हरी घेताना पॅकेज घराबाहेरच दारातच ठेवायला सांगावे.
- फुड किंवा सामानाच्या पॅकेजचे बाहेरील आवरन/ पिशवी काढून त्वरीत नष्ट करावे. 
- किराना सामानाची डिलिव्हिरी घेतल्यानंतर पॅक प्रॉडक्टस व्यवस्थित सॅनिटाईज करावे.
-  भाजीपाला फळे अशा सामानाची डिलिव्हरी घेतल्या नंतर स्वच्छ धुऊन घ्यावेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT