kilimanjaro-mountain 
पुणे

गिर्यारोहण दिन विशेष : आफ्रिकेच्या किलीमांजारोवर तिरंगा फडकला

सकाळवृत्तसेवा

पुणे - शून्याच्या खाली तापमान, जोरात वाहणारे वारे, अतिशय प्रतिकूल वातावरण आणि बर्फवृष्टी, अशा परिस्थितीमध्ये भारत-टांझानिया या देशातील एअर-बबल फ्लाइटच्या माध्यमातून कोरोनाकाळात प्रथमच आफ्रिकेतील किलीमांजारो शिखरावर देशाचा तिरंगा फडकला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भौतिकशास्त्र विषयातून पीएचडी करणाऱ्या ३४ वर्षीय आनंद बनसोडे आणि आयुष खरे या गिर्यारोहकांनी अनोख्या मोहिमेतून युवकांना गिर्यारोहणाबाबत उर्जात्मक संदेश दिला आहे. कोरोनामुळे गिर्यारोहण आणि ॲडव्हेंचर प्रकारांनाही बंदी घातली होती. मात्र, सध्या काही देशांमध्ये गिर्यारोहणाला प्रशासनामार्फत परवानगी दिली आहे. परंतु संसर्गाच्या भीतीमुळे गिर्यारोहणाला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गिर्यारोहण व पर्यटनाला पुन्हा चालना मिळावी हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे आनंदने सांगितले. 

भारतातून नोव्हेंबरमध्ये टांझानिया देशासाठी एअर बबल फ्लाइटची सुरुवात केली होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय मोहीम राबविण्याची संधी मिळाली. किलीमांजारो या शिखराची उंची सुमारे १९ हजार फूट असून, १ ते ५ डिसेंबर दरम्यान ही मोहीम पूर्ण केली
- आयुष खरे, गिर्यारोहक

विद्यार्थी आणि नागरिकांसाठी ‘स्पेस टुरिझम’ राबविण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी सध्या रशियाच्या अवकाश संस्थेच्या मदतीने लोकांना प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- आनंद बनसोडे, गिर्यारोहक

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT