Sakal Sahyadri Suraksha Kawach
Sakal Sahyadri Suraksha Kawach 
पुणे

सभासदत्व नूतनीकरणासाठी आज अखेरचा दिवस

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘सकाळ’ व सह्याद्री हॉस्पिटलच्या ५० वर्षांवरील व्यक्तींसाठीच्या ‘सुरक्षा कवच योजने’च्या सभासदत्व नूतनीकरणाची अंतिम मुदत गुरुवारी (ता. १०) संपत आहे. 

या योजनेतील दीड लाख रुपयांची विमा मर्यादा आता दोन लाखांपर्यंत, तर औषधांसाठीची सवलत १५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविली आहे. या शिवाय विविध वैद्यकीय सेवांवर २० ते ७५ टक्‍क्‍यांपर्यंत सवलत, तज्ज्ञांचा सल्ला, प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप कार्ड, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, कॅथेटर अँजिओग्राफीसाठी विशेष पॅकेज आदी सुविधांचाही लाभ घेता येणार आहे. सभासदांना ‘सकाळ’तर्फे आठ दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचाही आस्वाद घेता येईल. 

योजनेत २००९ पासून एकदाही आंतररुग्ण सेवा न घेणाऱ्या सभासदांसाठी विमा मर्यादा दोन लाख ३० हजार रुपये आहे. सभासदांच्या ५० वर्षे वयाखालील नातेवाइकांना वा परिवारातील व्यक्तींनाही सवलत आहे.

नवीन सभासद नोंदणीसाठी निवास व वयाच्या दाखल्याची प्रत देणे आवश्‍यक आहे.

माझे वडील आजारी असताना त्यांना या योजनेचा बराच फायदा झाला. माझ्या स्वत:च्या ऑपरेशनच्यावेळीही या योजनेचा मोठा हातभार लागला. ‘सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच’ योजना सुरू झाल्यापासून आम्ही सभासद आहोत. तुम्हीही सभासदत्व घेऊन या योजनेचा लाभ घ्यावा, ही सदिच्छा. 
- सतीश दिनकर देशपांडे, सभासद

नोंदणीसाठी... 
वय वर्षे ५० ते ६९ साठी : ३५०० रुपयांचा धनादेश ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे अधिक ८०० रुपयांचा धनादेश ‘सकाळ मीडिया प्रा. लि.’ या नावाने द्यावा. 
वय वर्षे ७० व अधिक - ४६०० रुपयांचा धनादेश ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे अधिक ८०० रुपयांचा धनादेश ‘सकाळ मीडिया प्रा. लि.’ या नावे द्यावा. 
नोंदणी शुल्क रोखीनेही भरता येईल. 

नोंदणी ठिकाणे - सह्याद्री हॉस्पिटल, डेक्‍कन जिमखाना- कर्वे रस्ता. कोथरूड-पौड रस्ता, वनाजसमोर. बिबवेवाडी-सुहाग मंगल कार्यालयाशेजारी. हडपसर-भोसलेनगर. नगर रस्ता-हर्मिस हेरिटेज फेज २. शास्त्रीनगर- येरवडा. शनिवारवाड्याजवळ- कसबा पेठ. 
संपर्क  - ७७९८३३०१२३, ७७९८३२०१२३ (स. ९.३० ते सायं. ५.३०)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रातील मतदार 'विनाश'ला नव्हे तर 'विकास'ला मत देण्याइतपत हुशार आहेत; राऊतांना भाजप नेत्याचं प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT