चास, ता.२८ : चास येथील पुरातन सोमेश्र्वर मंदिरातील महाशिवरात्रीची तयारी पूर्ण झाली असून, गेली दोन वर्ष कोरोनाच्या निर्बंधांमुळे मंदिर बंद राहिल्याने चालू वर्षी एक लाखाच्या वर भाविक येतील असा अंदाज करत मंदिर प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून भजनांच्या भव्य स्पर्धांचे आयोजन केल्याची माहिती शिवसेनेचे उपतालुका प्रमुख संजय घनवट यांनी दिली आहे.
भजन स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी एकवीस हजार, द्वितीय क्रमांकासाठी पंधरा हजार, तृतीय क्रमांकासाठी अकरा हजार रुपायांची यांसह उत्तेजनार्थ बक्षीसेही ठेवण्यात आली आहेत.
स्वर्गीय आमदार सुरेश गोरे यांच्या कल्पनेतील सोमेश्र्वर मंदिर व परिसराला नयनरम्य रूप प्राप्त करून दिले ते शिवसेनेचे घनवट, जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांच्या पुढाकाराने या वर्षी भव्य दिव्य स्वरूपात महाशिवरात्रीचा सोहळा साजरा करण्यात येत आहे. मंदिरावर फुलांच्या सजावटीसह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी दहा वाजता विलास महाराज वाघ यांचे हरिकीर्तन होणार असून सोमेश्र्वर मंदिर व परिसराचा कायापालट करून मंदिर व परिसर सुशोभीकरण करण्यासाठी मोलाचे योगदान दिल्याबद्दल संजय घनवट यांचा चास व पंचक्रोशीच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन चास व पंचक्रोशी, संजूभाऊ घनवट युवा मंच, राजेंद्र गायकवाड, संदीप ढमढेरे, विनायक मुळूक, मा. सरपंच अनिल टोके, अंकुश रासकर यांसह चास, आखरवाडी, पापळवाडी, मिरजेवाडी, घनवटवाडी, बहिरवाडी येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच समस्त ग्रामस्थ व तरुण मंडळे करणार आहेत.
--------------------------------------------------------------------------
00003
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.