esakal
पुणे

जिल्ह्यात पाहिलाच बायो-सीएनजी प्रकल्प श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याकडून पाटेठाण येथे उभारणी; प्रतिदिन १० मेट्रीक टनाची क्षमता

वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील पानसरेवस्तीवर शनिवारी (ता. १८) रात्री बिबट्याने एक बोकड व एक शेळी ठार केली.

CD

राहू, ता. २७ : केंद्र व राज्य सरकारच्या धोरणानुसार साखर कारखान्यांकडून डिस्टिलरी प्रकल्पांची उभारणी करून त्यांची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार पाटेठाण (ता. दौंड) येथील श्रीनाथ म्हस्कोबा कारखान्याच्या डिस्टिलरी प्रकल्पातील उत्पादित बायोगॅस सध्या बॉयलरसाठी वापरला जात आहे. अतिरिक्त बायोगॅसचे शुद्धीकरण करून प्रतिदिन १० मेट्रीक टन क्षमतेचा कॉम्प्रेसड बायोगॅस (बायो सीएनजी) प्रकल्प उभारण्याचे काम सध्या कारखान्याकडून सुरु आहे. हा प्रकल्प उभारणारा जिल्ह्यातील हा पहिलाच कारखाना आहे.

या प्रकल्पामुळे पर्यावरण पूरक बायो-सीएनजी गॅस उपलब्ध होणार आहे. हा गॅस ट्रॅक्टरसह, इतर चार चाकी वाहने चालविले जाऊ शकतात. यामुळे शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होऊ शकते. अशा प्रकारचे किट्स काही कंपन्यांनी विकसित केले आहेत. त्यांच्या चाचण्या कारखान्यावर सध्या सुरु आहेत.
कारखान्याचे कार्याध्यक्ष विकास रासकर म्हणाले, ‘‘या प्रकल्पासाठी लागणाऱ्या शासकीय परवानग्या घेण्यात आल्या असून त्याच्या उभारणीचे काम सध्या अंतिम टप्प्यात सुरु आहे. या प्रकल्पात तयार होणारा गॅस ९० ते ९२ टक्के शुद्ध असणार आहे. गॅस वाहतुकीसाठी वाहनांवर कॅसकेड बसविण्यात येणार आहेत.’’

उपाध्यक्ष बबनराव गायकवाड म्हणाले, ‘‘कारखान्याने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि अधिकारी प्रामाणिकपणे काम करीत असून कारखान्याची वाटचाल प्रगतीच्या दिशेने सुरु आहे. भविष्यात सर्वांना बरोबर घेऊन शेतकरी बांधवांसाठी समाजोपयोगी उपक्रम राबविण्यावर अधिक भर दिला जाणार आहे.’’

मुख्य कार्यकारी अधिकारी डी. एम. रासकर म्हणाले, ‘‘डिस्टीलरीमध्ये इथेनॉल बनवताना निघणारा कार्बन डायऑक्साईड (सीओटू) हवेत मिसळून वायू प्रदूषण होऊ नये यासाठी कारखाना खबरदारी घेत आहे. ‘सीओटू’वर प्रक्रिया करून त्यांचे रूपांतर द्रव रूपात करून किंवा त्याचा सुका बर्फ तयार करून संबंधित वापर करणाऱ्या उद्योगाकडे पाठवीत आहे.’’


डिस्टिलरी प्रकल्पातून निघणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर केला जात आहे. तसेच या सांडपाण्यावर प्रक्रिया करून बायो-सीएनजी गॅसची निर्मिती केली जाणार आहे. विक्रीसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन पेट्रोलियम कंपनीशी करार केला आहे. पर्यावरणपूरक प्रकल्प कारखाना राबवीत
आहे यापुढे असाच भर राहणार आहे.
-पांडुरंग राऊत, अध्यक्ष, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना

या परिसरात बिबट्याने शेळ्यांवर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी शेजारील खोमणे वस्तीवर बिबट्याने गेल्या महिन्यात दोन शेळ्या मारल्या होत्या. ऊसतोड झाल्यामुळे शेती मोकळी होत आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरू लागला आहे. रात्रीच्या वेळी काम करण्यासाठी शेतकऱ्यांमधून भीतीचे वातावरण आहे. संबंधित ठिकाणी वनरक्षक योगेश कोकाटे, संपत खोमणे, जयराज जगताप, सचिन काळे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि बिबट्याचे ठसे असल्याचे खात्री केली. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash : मेंटनन्स किंवा इंजिनमध्ये काहीच त्रुटी नव्हत्या; विमान दुर्घटनेच्या अहवालावर एअर इंडियाच्या CEOनी दिली प्रतिक्रिया

Loan Planning: कर्जमुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल... CA अभिजित कोळपकर यांचं 'सकाळ'च्या वेबिनारमध्ये मार्गदर्शन

ENG vs IND 3rd Test: शुभमन गिल ६ धावांवर आऊट झाला, पण राहुल द्रविडचा २३ वर्षे जुना विक्रम मोडला

Kolhapur Politics : प्रकाश आबिटकरांना स्वकियांचेचं आव्हान, भाजप, अजित पवार गटाचा विरोध; जिल्हा नियोजन समितीवरून पडणार ठिणगी

Financial Freedom: आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल कशी करावी? 'सकाळ'च्या वेबिनारमध्ये भूषण गोडबोले यांनी दिला अर्थमंत्र

SCROLL FOR NEXT