पुणे

वेल्ह्यात २० जणांना कोरोनाची बाधा

CD

वेल्हे, ता. १३ : आमदार संग्राम यांच्या संपर्कात आलेल्या वेल्हे तालुक्यात सभापती दिनकर सरपाले व गटविकास अधिकारी विशाल शिंदे यांच्यासह महसूल मधील कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाली असल्याने प्रशासनाकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
लोकप्रतिनिधी अधिकारी व कर्मचारी असे मिळून वेल्हे तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वीसवर पोचली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी दिली.

याबाबत देवकर म्हणाले, वेल्हे तालुक्यात आतापर्यंत वीस जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या कोरोनाची लक्षणे सौम्य असून चार पाच दिवसात बरा होत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता त्रास होत असल्यास ताबडतोब जवळच्या शासकीय दवाखान्यात उपचारासाठी जावे तसेच एखाद्याला गंभीर लक्षणे असल्यास वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल व्हावे.
तालुक्यातील तहसील कार्यालय, पंचायत समिती येथील प्रशासकीय अधिकारी व व काही पदाधिकारी शासकीय कर्मचारी यांना देखील लागण झालेली आहे. सर्दी ताप किंवा त्यापेक्षा वेगळी लक्षणे असल्यास ताबडतोब शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी जावे असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर, सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचा वापर करावा व वारंवार हात धुवावेत गरज असल्यासच घराबाहेर पडावे, गर्दी टाळावी असे आवाहन तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी केले.
तालुक्यातील पर्यटन स्थळे किल्ले तोरणा राजगडावर बंदी असून जमावबंदीचे उल्लंघन, विना मास्क आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्र हवामान अंदाज! पुढचे काही दिवस पावसाचे सावट; आंबा, काजू बागायतीवर परिणाम, असा असेल अंदाज

Nagpur Child Abuse Case : नागपूर हादरलं! जन्मदात्यांनीच १२ वर्षीय मुलाल साखळीने बांधलं, माणुसकीला काळिमा फासणारी घटना

Resume लगेच अपडेट करा! 2026 मध्ये या विभागात निघणार मेगा भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

Matar Dhokla Recipe: नेहमीचाच ढोकळा खाऊन कंटाळलात? हिवाळ्यात बनवा मटार ढोकळा, घरच्यांकडून मिळेल वाहवा!

अग्रलेख - कृष्णेच्या काठाकाठाने

SCROLL FOR NEXT