sakal
पुणे

तळेगाव ढमढेरे येथील ‘गरिबांचे डॉक्टर’

CD

अलीकडील काळात विविध क्षेत्रांमध्ये नवनवीन बदल झालेले आहेत. तंत्रज्ञानाच्या बदलाबरोबरच वैद्यकीय क्षेत्रातील सेवेलाही मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य मंदिरात सेवा करताना अनेक डॉक्टरांनी सामाजिक दृष्टिकोनसमोर ठेवून मानवी सेवेचे व्रत स्वीकारले आहे. त्यापैकीच सामाजिक बांधिलकी जपणारे वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत नाव म्हणून तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील श्री साईबाबा हॉस्पिटलचे संचालक डॉ. हिरामण देवराम तुरकुंडे यांचे नाव घेतले जाते. त्यांचे मूळगाव तळवडी (ता. कर्जत, जि. नगर) हे असून, वैद्यकीय व्यवसायामुळे ते तळेगाव ढमढेरे येथे अनेक वर्षांपासून स्थायिक झाले आहेत.
डॉ. तुरकुंडे यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण छोट्याशा खेड्यात झाले. नंतर दहावीपर्यंतचे शिक्षण शेजारील गावात सहा किलोमीटर अंतर पायी चालत घेतले. कर्जत येथे बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षणातील करिअरच्या टप्प्यातील अंतिम शिक्षण बीड येथील एस. के. एच. मेडिकल कॉलेजमध्ये घेऊन बी.एच.एम.एस. (होमिओपॅथी) वैद्यकीय पदवी घेतली.
डॉ. तुरकुंडे यांच्या लहानपणी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्यांनी आई-वडील, बहिण-भाऊ व इतर नातेवाईकांच्या आशीर्वादाने वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. वडील शेतकरी असल्यामुळे शिक्षण घेताना दुष्काळी भागाच्या झळा सर्वांनाच सोसाव्या लागल्या. परिस्थितीमुळे शिक्षणात अनंत अडचणी आल्या, परंतु त्यावर मात करून आई-वडिलांनी शिक्षणासाठी पैसा पुरवला.
डॉ. तुरकुंडे यांनी सन १९९७ ला वैद्यकीय प्रॅक्टिसची मुहूर्तमेढ पुण्यामध्ये सुरु केली. प्रॅक्टिस परिपूर्ण होऊन वैद्यकीय सेवेबद्दल आत्मविश्वास निर्माण झाला. त्यानंतर तळेगाव ढमढेरे येथे सन १९९८ मध्ये ‘साईबाबा क्लिनिक’ या नावाने लहान दवाखाना सुरु केला. येथील क्लिनिक सुरु करायला त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागले. परंतु, त्यांचे वैद्यकीय गुरू डॉ. अनिल वरपे यांच्या मदतीने व मार्गदर्शनाखाली छोटेसे क्लिनिक सुरू करून गोर-गरीब लोकांची प्रामाणिक सेवा करण्यास सुरुवात केली. हळूहळू लोकांचा चांगला प्रतिसाद मिळून वैद्यकीय सेवेत चांगला जम बसला.
डॉ. तुरकुंडे यांनी सन २००२ मध्ये स्वतःच्या जागेत हॉस्पिटलची इमारत बांधून वैद्यकीय सेवा सुरू केली. छोट्याशा क्लिनिकचे रोपटे साईबाबा हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करून त्याचा आता विस्तार केला आहे.


अलीकडील काळात डॉ. तुरकुंडे यांचे नाव ‘गरिबांचे डॉक्टर’ म्हणून परिसरातील लोक घेतात. गरीब, निराधार व गरजू लोकांना अल्पदरात तर कधी मोफत औषध उपचार त्यांनी केले आहेत. काही रुग्णांना पुढील उपचारासाठी पुण्याला पाठवण्याची वेळ आल्यास स्वतः आर्थिक मदत देखील त्यांनी केली आहे.

सामाजिक कार्यात सहभाग
डॉ. तुरकुंडे यांचा सामाजिक कार्यातही मोठा सहभाग असतो. गावात दरवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी मोफत औषधे व आरोग्य सेवा ते पुरवितात. स्वतःच्या मूळ गावी गेल्यानंतरही गावातील लोकांकडून कसलेही शुल्क न घेता आजपर्यंत ते मोफत उपचार करत आहेत. गावाकडून येणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना गेली २५ वर्षे मोफत औषध उपचार करून राहण्याची व भोजनाची व्यवस्था ते करतात.

कोरोना काळातील सेवा
डॉ. तुरकुंडे यांनी कोरोना काळात स्वतःच्या जिवाची व कुटुंबाची पर्वा न करता त्यांनी अखंडित आरोग्य सेवा देऊन अनेकांना दिलासा दिला आहे. तसेच, आजारी व्यक्तींना धीर देण्याचे व योग्य मार्गदर्शन करण्याचे काम कोरोना काळात त्यांनी केले आहे. म्हणूनच परिसरातील लोक त्यांच्याकडे गरिबांचे डॉक्टर म्हणून पाहतात.

कुटुंब व पत्नीचा आधार
वैद्यकीय चळवळीत डॉ. तुरकुंडे यांची पत्नी शीतल यांचीही प्रॅक्टिस करत असताना मोलाची साथ मिळते. पत्नीची मोरपंखी साथ, तसेच आई-वडिलांनीही चांगले काम करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले आहे.

श्री साईबाबा हॉस्पिटलमधील सुविधा

हॉस्पिटलची प्रशस्त इमारत, शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे-जेजुरी रस्त्यालगत हॉस्पिटल, बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग, होमिओपॅथिक उपचार, तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी, स्वतंत्र लॅब, ईसीजी, मायनर ओटी आदी सुविधांयुक्त हे हॉस्पिटल असून, रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध आहे.

आगामी संकल्प
आगामी काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात आरोग्य सेवा व उपचार देण्याचा डॉ. तुरकुंडे यांचा मानस आहे. त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिरे, महिलांसाठी मोफत हेमोग्लोबिन व मार्गदर्शन शिबिर, किशोरवयीन मुलींसाठी शारीरिक समस्यांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी विषयावर वेळोवेळी शिबिरे आयोजित करून मार्गदर्शन व आरोग्य सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे.
डॉ. तुरकुंडे यांच्या आरोग्य सेवेस सलाम!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News : कारागिराने जबड्यात लपविले 15 लाखांचे सोने, पण 'या' एका चुकीमुळे उघड झाली चोरी

१० लाख शेतकऱ्यांनी भरल पीकविमा! डाळिंबसाठी आज तर सिताफळासाठी ३१ जुलैला संपणार मुदत; ॲग्रीस्टॅक असेल तरच भरता येणार पीकविमा

Latest Marathi News Updates: हरिद्वारमध्ये बुडणाऱ्या कावडियांना एसडीआरएफच्या जवानांनी वाचविले

Cyber Fraud Alert: सायबर फसवणुकीचा नवा प्रकार; काय आहे 401# कोड आणि त्याचे धोके, जाणून घ्या आणि आताच सावध व्हा!

Python Enters House Video: भयानक! मोबाइल बघत बसली होती मुलं, तितक्यात घरात शिरला महाकाय अजगर अन् मग...

SCROLL FOR NEXT