पुणे

दाखल कोरोना रुग्णांची संख्या नगण्य

CD

पुणे, ता. १२ : शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत असली तरी, घरच्या घरीच कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण तुलनेने खूप मोठे आहे. शहरात उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अगदी नगण्य असल्याचे दिसून आले आहे. सध्या शहरातील २१ हजार ४८४ सक्रिय रुग्णांपैकी केवळ १ हजार १९ जण रुग्णालयांत दाखल आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण शहरातील एकूण सक्रिय रुग्णांच्या प्रमाणात फक्त पावणे पाच टक्के (४.७४ टक्के) इतके आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या कोरोना रुग्ण आकडेवारीच्या अहवालावरून हे स्पष्ट झाले आहे.
पुणे शहराप्रमाणे जिल्ह्यातही हीच स्थिती आहे. जिल्ह्यातील एकूण ३६ हजार २४९ सक्रिय कोरोना रुग्णांपैकी केवळ १ हजार ७५२ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयांत दाखल करावे लागले आहे. रुग्णालयांत दाखल होणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिक, कोरोना लसीकरणाचा डोस न घेतलेले आणि सहव्याधी असलेल्या रुग्णांचा समावेश असल्याचे जिल्हा आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

क्षेत्रनिहाय कोरोना रुग्ण स्थिती
क्षेत्र रुग्णालयात दाखल गृहविलगीकरणातील रुग्ण एकूण रुग्ण

पुणे, १०१९,......२१ हजार ४८४,..... २२ हजार ५०३
पिंपरी चिंचवड,......४५४,....९ हजार ३२,.... ९ हजार ४८६
जिल्हा परिषद,....११९,....४ हजार १९५,.... ४ हजार ३१४
नगरपालिका क्षेत्र,.....८७,... ८९९,.....९८६
कॅंटोन्मेंट बोर्ड,.....७३,.... ६३९,..... ७१२
एकूण, १ हजार ७५२,..... ३६ हजार २४९,....३८ हजार १.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 1st ODI : यशस्वी जैस्वाल OUT, रिषभ पंतला स्थान नाही! हर्षित राणा खेळणार; पहिल्या वन डे साठी Playing XI अशी असणार...

Ambarnath Election: अंबरनाथमध्ये शिंदेंनी भाजपचं स्वप्न धुळीस मिळवलं; काँग्रेसला सोबत घेतलेल्या भाजपचं काय?

Tribal Development Scam : आदिवासी विकास निधीवर डल्ला; घोडेगावमध्ये ३१ लाखांच्या शासकीय निधी अपहारप्रकरणी गुन्हा दाखल!

Budget Session 2026: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २८ जानेवारी पासून सुरू होणार; तारखा जाहीर

Winter Hot Shower Risks: आरामदायक वाटणारी गरम पाण्याची आंघोळ तुमची त्वचा हळूहळू खराब करतेय का? तज्ज्ञांनी सांगितले धोके

SCROLL FOR NEXT