शिरूर, ता. ३१ : आमदार अशोक पवार यांच्या जिल्हा बॅंकेवरील निवडीबद्दल येथे आयोजिलेल्या नागरी सत्कार सोहळ्यात नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल यांनी आगामी नगर परिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले. नगर परिषद निवडणुकीसाठी पक्षविरहित पॅनेल टाकणार असल्याचे जाहीर करताना ‘पवार व धारिवाल या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याने भविष्यातील राजकारणात आम्ही एकत्रच असू,’ असेही स्पष्ट केले.
प्रकाश धारिवाल मित्र मंडळाने आयोजिलेल्या या नागरी सत्कार सोहळ्यास नगराध्यक्षा वैशाली वाखारे, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील भालेकर, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, शिरूर बाजार समितीचे उपसभापती प्रवीण चोरडिया, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, संचालक सुरेश पाचर्णे, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी शहराध्यक्ष अमोल चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी धारिवाल म्हणाले, ‘‘आमदार पवार हे दूरदृष्टीचे अभ्यासू नेते असून, नियोजनबद्ध पद्धतीने ते तालुक्याचा विकास साधत आहेत. शिरूर शहर विकासात त्यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांच्या कार्यक्षम व अभ्यासू प्रवृत्तीची शहर विकासात मोलाची मदत होत आहे. त्यांची सहकार क्षेत्रातील जाण वादातीत असल्यानेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना जिल्हा बॅंकेवर काम करण्याची संधी दिली.’’
आमदार पवार म्हणाले, ‘‘शिरूर शहरातील विकासासाठी गेल्या वर्षभरात शासनाकडून शंभर कोटींहून अधिक निधी मिळवला असून, या निधीतून होणाऱ्या कामांतून शहराचा कायापालट होईल. जिल्हा बॅंक निवडणुकीनंतर बॅंकेच्या अध्यक्षपदाची संधी आली होती. तथापि, शिरूर-हवेली मतदारसंघाकडे येथील विकासाकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी ते नम्रपणे नाकारले. शिरूर शहराच्या विकासास प्राधान्य देताना शहरातील रस्ते, बसस्थानक, न्यायालय या कामांना प्राधान्य दिले आहे. ’’
यावेळी ‘यशवंत डेअरी’चे अध्यक्ष सचिन कातोरे, शिवसेवा मंडळ ट्रस्टचे चिटणीस मनसुखलाल गुगळे, माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नामदेवराव घावटे, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष ॲड. किरण आंबेकर यांचीही भाषणे झाली. युवा नेते किरण पठारे पाटील यांनी स्वागत, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संतोष भंडारी यांनी प्रास्तविक; तर राष्ट्रवादी कॉंग्रेस लीगल सेलचे तालुकाध्यक्ष ॲड. प्रदीप बारवकर यांनी सूत्रसंचालन केले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी यांनी आभार मानले.
एकमेकांवर उधळली स्तुतिसुमने
आमदार पवार व धारिवाल समर्थकांत गेल्या काही दिवसांपासून सोशल वॉर रंगले होते. चार महिन्यानंतर हे दोन्ही नेते एकत्र आले व त्यांनी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळले. त्यामुळे या शितयुद्धावर पडदा पडला. ‘धारिवाल यांच्यासारखी माणसे विरळ असून, शिरूर शहराला त्यांचे नेतृत्व लाभणे हे भाग्य आहे. विकासासाठी यापुढेही त्यांचेच नेतृत्व पाहिजे,’ अशा शब्दांत आमदार पवार यांनी धारिवाल यांच्या शहरातील नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले; तर ‘आमच्यात फाटाफूट वा वाद नसून, पुड्या पसरविण्याचे काम थांबले पाहिजे. आमदार पवार यांच्या माध्यमातून विकासकामे वेगाने होऊन प्रगती साधली जात असल्याने ते पुढेही आमदार राहतील. ते आमदार म्हणजे मी आमदार,’ असे नमूद करीत भविष्यातील राजकीय वाटचालीत त्यांच्याशी स्पर्धा नसल्याचे सूचित केले.
sur30p01
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.