gutkha sakal
पुणे

भोर : बंदी असूनही शहरात गुटखा विक्री जोमात

CD

भोर : बंदी असूनही शहरात सर्वत्र गुटखा, मावा यासारखे नशा येणारे पदार्थ सर्रास मिळत आहेत. पानटपरी, छोटे चहाचे स्टॉल्स व जनरल स्टोअर्स यांच्यासोबत आता किराणा दुकानातही गुटखा उपलब्ध होत आहे. यामुळे तालुक्यात बंदी कागदावरच असल्यामुळे बेकायदा गुटकाविक्री जोमात सुरू आहे. (Pune District Crime News)

शासनाचे भोरमधील पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि नगरपालिका प्रशासन याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे गुटकाविक्री जोरात सुरू आहे. भोर शहरात सासवड व महाड मार्गे गुटखा येत असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यातील ठराविक व्यक्ती नियमीतपणे व राजरोसपणे गुटक्याची वाहतूक करीत आहेत. पोलिसांकडून त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे. गुटखा शहरात आल्यानंतर ठराविक दुकानदारांकडे पाठविला जातो. तेथून संबंधित रिटेलर खरेदीदार घेऊन जातो. गुटख्याच्या एका पुडीची किंमत १५ ते २० रुपये आहे.

गुटख्यास बंदी असल्यामुळे कोणीही दराचा विचार करीत नाही. मिळेल त्या किमतीने गुटखा खरेदी केला जात आहे. भोरच्या ग्रामीण भागातील खरेदीदारांना भोर शहरातील किराणा मालाच्या दुकानातून गुटखा पुरविला जातो. या महिन्यात लॉकडाउनच्या भितीने अनेकांनी गुटक्याचा साठा करून ठेवला आहे. शहरातील अनधिकृत टपऱ्या, छोटे स्टॉल्स आणि पत्र्याचे तात्पुरते उभारलेले शेड यांमधूनही गुटकाविक्री केली जाते. एक पानटपरीधारक महिन्याला लाखो रुपयांची उलाढाल करतो. शहरातील अनधिकृत टपरी व बांधकामांवर नगरपालिकेकडून कुठलीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे अवैध धंदेही सुरू होण्यास प्रोत्साहन मिळत आहे.

पोलिसांकडूनही तात्पुरती जुजबी कारवाई
अन्न व औषध प्रशासन विभाग भोर तालुक्यात फिरकतच नाही आणि पोलिसांकडूनही तात्पुरती जुजबी कारवाई केली जाते. आणि अवैध विनापरवानगी बांधकामांवर नगरपालिका कारवाईच करीत नाही. यामुळे हा अनधिकृत व्यवसाय सर्रास सुरु आहे. भोर पोलिसांनी गेल्या वर्षी ३० मे रोजी महाडहून भोरला विक्रीसाठी येत असलेला १ लाख १२ हजार ११२ रुपये किमतीचा गुटखा पकडला होता. त्यानंतर भोरमध्ये एकही कारवाई झालेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Mumbai News: पावसाची पुन्हा विश्रांती पण मुंबईकरांना दिलासा, सातही धरणात ९५ टक्के पाणीसाठा; पाहा आकडेवारी

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

SCROLL FOR NEXT