आंबेठाण, ता. २८ : राज्य औद्योगिक विकास महामंडळाने ७५ मीटर रुंदीचा रस्ता पुणे-नाशिक महामार्गापर्यंत तात्काळ मार्गी लावावा, चाकण-वासुली फाटा रस्त्यावर सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत अवजड वाहतूक बंद करावी आणि वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी वाहतूक नियमनासाठी कर्मचारी नेमावे अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टेपाटील यांनी एमआयडीसीकडे केली आहे. जर पुढील दहा दिवसांत यावर कार्यवाही केली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा देखील बुट्टेपाटील यांनी निवेदनात दिला आहे.
एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता प्रकाश भडंगे यांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी खेड ग्रामीण भाजपचे मंडल अध्यक्ष सुनील देवकर, आंबेठाणचे माजी सरपंच दत्तात्रेय मांडेकर, भाजप युवा मोर्चाचे काळूराम पिंजण, माजी उपसरपंच शरद निखाडे, रोहित डावरे, भाऊसाहेब लांडगे, आनंद निखाडे उपस्थित होते.
चाकण औद्योगिक वसाहत टप्पा क्रमांक दोनमध्ये दिवसागणिक कारखाने वाढत आहेत. त्यामुळे अवजड वाहतूक वाढत असून चाकण ते वासुली फाटा या प्रमुख जिल्हा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. एमआयडीसीने वराळे येथील कॉर्निंग कंपनीपर्यंत केलेला ७५ मीटर रुंदीचा रस्ता पुणे-नाशिक महामार्गाला न जोडल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक २० चा उपयोग खेडच्या पश्चिम भागातील तीसहून अधिक गावांना होत असून या मार्गावरून शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात. परंतु नित्याच्या वाहतूक कोंडीने त्यांना वेळेत पोहोचता येत नाही. शेतकरी भाजीपाला मार्केटला वेळेत नेऊ शकत नाही, त्यामुळे मोठे नुकसान होत आहे. अवघ्या १० किलोमीटर अंतरासाठी दोन तास वेळ लागत आहे. प्रवासात वेळ जात असल्याने नागरिक वैतागले असून शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर जाता येत नाही. मोठ्या आणि अवजड वाहनांमुळे लहान गाड्यांना रस्ता शिल्लक राहत नाही. परिणामी अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याची परिस्थिती आहे.
भांबोली फाटा, कोरेगाव फाटा, आंबेठाण गाव, दवणे वस्ती फाटा, बिरदवडी येथे वाहतूक नियोजन करण्यासाठी पोलिस कर्मचारी किंवा एमआयडीसीने कर्मचारी नेमावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.