आंबेठाण, ता. २८ : ‘‘आपल्या भागात एमआयडीसी आल्याने व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या भागाची गरज ओळखून मंगेश मांडेकर यांच्या ‘राजमुद्रा ग्रुप’ने निवासी हॉटेल आणि चवदार जेवण देण्याची व्यवस्था केली आहे. यात ग्राहकांना आकर्षक सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. ‘हॉटेल राजमुद्रा’ने व्यवसायात स्वतःची मुद्रा निर्माण केली आहे. व्यवसायाची सर्व कौशल्य मंगेश मांडेकर यांनी अमलात आणली आहे,’’ असे गौरवोद्गार भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील यांनी व्यक्त केले.
आंबेठाण (ता. खेड) येथे ‘राजमुद्रा ग्रुप’चे सर्वेसर्वा मंगेश मांडेकर यांच्या नूतन हॉटेलच्या उद्घाटनप्रसंगी बुट्टे पाटील बोलत होते. याप्रसंगी माजी उपसभापती कैलास गाळव, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे, हिंदू धर्म रक्षक संघाचे कार्याध्यक्ष अंकुश काळे पाटील, जनकल्याण समितीचे सचिन शिवेकर, माजी सरपंच सुभाष मांडेकर, माजी सरपंच दत्तात्रेय मांडेकर, अमोल पानमंद, रवींद्र चव्हाण, भानुदास दवणे, शांताराम चव्हाण, अमोल पानसरे, काळूराम गोगावले आदी उपस्थित होते.
यावेळी कैलास गाळव,रोहिदास गडदे यांनी शुभेच्छा दिल्या. सुभाष मांडेकर म्हणाले, ‘‘मंगेश मांडेकर यांनी आजवर प्रामाणिकपणाने आणि चिकाटीने व्यवसाय केला. तसेच पुढील काळात व्यवसायात सातत्य ठेवावे.’’
मंगेश मांडेकर, योगेश मांडेकर, साईनाथ मांडेकर, सागर मांडेकर, किरण मांडेकर, राजूभाऊ जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तुषार वाटेकर यांनी सूत्रसंचालन केले. माजी सरपंच दत्तात्रेय मांडेकर यांनी आभार मानले.
दरम्यान, दिवसभरात खेडचे आमदार बाबाजी काळे, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी राजमुद्रा हॉटेलला भेट दिली. मंगेश मांडेकर यांनी आजवर केलेल्या कष्टाचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.