आंबेठाण, ता. १२ : खेड तालुक्यातील भामा नदीवरील दोन बंधाऱ्यांची दुरुस्ती झाली असून उर्वरित आठ बंधाऱ्यांसाठी २० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच भामा आसखेड धरणाच्या बुडीत क्षेत्रात बंधारे प्रस्तावित केले असून लवकरच त्यांना मंजुरी मिळेल, अशी माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली.
चासकमान, कळमोडी आणि भामा आसखेड धरणांचा पाहणी दौरा आणि जलपूजन प्रसंगी ते भामा आसखेड धरण येथे बोलत होते. याप्रसंगी अधीक्षक अभियंता कुमार पाटील, कार्यकारी अभियंता मोहन जाधवर, साहाय्यक अभियंता आश्विन पवार, माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे, शिवसेना उपतालुका प्रमुख सुभाष मांडेकर, पप्पू राक्षे, अंकुश दरेकर, नितीन रायकर, रमेश बोऱ्हाडे, लहू कोळेकर, चंद्रकांत सातपुते, अमोल पाचपुते, विजय घनवट, बाळासाहेब कोळेकर, दत्ता कोळेकर, महेश शेटे, अभय डांगले, शशिकांत आहेरकर, मारुती धनवटे, सचिन तुळवे यांच्यासह परिसरातील नागरिक आणि धरण प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित होते.
भामा आसखेडच्या लाभ क्षेत्रातील एकूण आठ बंधाऱ्यांपैकी भोसे आणि काळूस येथील बंधाऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे.तर उर्वरित शेलू, कोरेगाव,बोरदरा,पिंपरी,वाकी,शेलगाव,कोयाळी आणि सिद्धेगव्हाण येथील बंधाऱ्याची दुरुस्ती लवकरच केली जाणार असून त्यासाठी जलसंपदा विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे.याशिवाय बुडीत क्षेत्रातील अंबोली येथील बंधारा पूर्ण करण्यात आला आहे. शिवे, पराळे, देशमुखवाडी, कोळीये, कोहिंडे, टेकवडी, कासारी या ठिकाणी बंधारे प्रस्तावित असल्याचे काळे यांनी सांगितले. आश्विन पवार यांनी सूत्रसंचालन करताना बंधाऱ्यांची दुरुस्ती आणि निधी याविषयी माहिती दिली. तर माजी पंचायत समिती सदस्य रोहिदास गडदे यांनी आभार व्यक्त करताना शेतकऱ्यांच्या जमिनी धरणात गेल्या असल्याने त्यांना पाण्यापासून वंचित ठेवू नये असे आवाहन केले.
भामा आसखेड धरणाच्या परिसरातील वाढते पर्यटन पाहता या ठिकाणी गार्डन किंवा पर्यटनासाठी अन्य सोयी करता येतील.त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायतीनी प्रस्ताव दिल्यास सोईस्कर ठरेल.
- कुमार पाटील, अधीक्षक अभियंता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.