पुणे

शिवे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निर्मला कोळेकर

CD

आंबेठाण, ता. ११ : शिवे (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निर्मला कोळेकर यांची निवड झाली आहे. निवडणुकीत समान बलाबल झाल्याने चिठ्ठीद्वारे झालेल्या निवडीत कोळेकर यांचे नशीब उघडले आहे. शिवे आणि वाकी तर्फे वाडा अशी ही पश्चिम भागातील मोठी ग्रामपंचायत आहे. कोळेकर यांनी यापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून काम केले आहे.
मावळत्या सरपंच कविता संतोष शिवेकर यांनी ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिल्याने ही निवडणूक घेण्यात आली. येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली.
यावेळी सभागृहात माजी सरपंच अक्षय शिवेकर, ज्ञानेश्वर शिवेकर, कविता शिवेकर, आनंद साकोरे, दीपाली कोळेकर, मनिषा शिवेकर, विनायक शिवेकर हे सदस्य उपस्थित होते.
सरपंचपदासाठी निर्मला कोळेकर आणि दीपाली कोळेकर असे दोन अर्ज आले होते. गुप्त पद्धतीने झालेल्या मतदानात दोघींनाही समान म्हणजे प्रत्येकी चार मते पडली. त्यामुळे चिठ्ठी काढण्यात आली. त्यात कोळेकर यांचे नाव निघाले.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडलाधिकारी राजेंद्र वडणे यांनी काम पाहिले. त्यांना ग्रामपंचायत अधिकारी उल्हास कोरडे यांनी सहकार्य केले.
निवडणूक शांततेत पार पडण्यासाठी माजी उपसभापती चांगदेव शिवेकर, शांताराम शिवेकर, पोलिस पाटील ज्ञानेश्वर साळुंखे, विश्वास शिवेकर, नामदेव शिवेकर, विश्वनाथ शिवेकर, विनायक कोळेकर यांनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: पाकिस्तानच्या बहिष्काराच्या निर्णयावेळी कसे होतं भारताच्या ड्रेसिंग रुमधील वातावरण? प्रशिक्षकांनी केला खुलासा

Ankita Bhandari Murder: खरे पीडित अंकिताचे आई वडीलच, बाकी फक्त राजकारण करतायत! मुख्यमंत्री भावूक; म्हणाले, गुन्हेगारांना सोडणार नाही

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

SCROLL FOR NEXT