पुणे

सादलगाव शाळेत रंगला पालखी सोहळा

CD

आंधळगाव, ता. २ : सादलगाव (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. पाना-फुलांनी सजविलेली माउलींची पालखी...पारंपारिक पोशाख, अभंग गात अखंड विठू नामाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत भक्तीमय वातावरणात पालखी सोहळा साजरा केला. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी, संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी दिंडीदरम्यान ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. आकर्षक फुलांनी सजविलेली पालखी आणि त्यामध्ये विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मुर्ती तसेच संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ग्रंथ ठेवला होता. ग्रामस्थांनी ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करून दर्शन घेतले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक शांताराम घोरपडे व ग्रामपंचायत सदस्य निर्मला केसवड यांच्या हस्ते पालखीचे पूजन केले. याप्रसंगी घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक कांतिलाल होळकर, माजी सरपंच संतोष जगताप, तंटामुक्तीचे अध्यक्ष मानसिंग होळकर, खंडेराव मिठे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राहुल केसवड, उपाध्यक्ष अमोल होळकर, महादेव होळकर गुरुजी, भाऊसाहेब गायकवाड, संतोष पवार, विकास चव्हाण, गणेश केसवड, संतोष माने आदींसह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेपासून गावात दिंडी काढली. विद्यार्थ्यांच्या फुगडीने दिंडी सोहळ्यात रंगत आणली. येथील राम मंदिरासमोर दिंडीचे आकर्षक रिंगण केले होते. सर्व विद्यार्थ्यांना ठिकठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने खाऊचे वाटप केले. रेश्मा जगताप, मंगल घोरपडे, अतुल कांडगे, सुरेश अवधूतवार, शब्बीर शेख, भागवत कारखीले, भरत काळे आदींनी पालखी सोहळ्याचे संयोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Reserves: अनेक जिल्ह्यांत सापडले सोन्याचे साठे; राज्याचं भविष्य बदलणार, किती आहे सोनं?

Latest Marathi News Live Updates : मुंबईत मुसळधार पाऊस, अनेक भागात साचलं पाणी

Vande Bharat Express: देशातील लांब पल्याची वंदे भारत महाराष्ट्रात; प्रवाशांसाठी आरामदायक, पुणे नागपूर ठरली सर्वाधिक दूरची रेल्वे

Pune Crime : तुझे अनैतिक संबंध, तलाक दे नाही तर... पुण्यात भरचौकात तरुणीवर धारदार शस्त्राने हल्ला

'सगळ्यांनी माझं हसू केलं, पण आता...' अभिषेक बच्चनसाठी बिग बींची भावूक पोस्ट, म्हणाले...'त्या थट्टेची जागा...'

SCROLL FOR NEXT