मांडवगण फराटा,ता. १५ : शिरूर तालुक्यात घडलेल्या अश्लील वर्तन व मारहाणप्रकरणी दोन आरोपींना मंगळवारी (ता. १२) मे. सी. एम. खारकर यांच्या न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. प्रवीण रामराव गरुड (वय ३८) व रामराव बापूराव गरुड (वय ७१, रा. गणेगाव दुमाला) या दोघांना न्यायालयाने कलम २९४ अंतर्गत प्रत्येकी एक महिन्याची साधी कैद व दोन हजार रुपये दंड, तसेच कलम ३५२ अंतर्गत प्रत्येकी पाचशे रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली.