मांडवगण फराटा, ता. २८ : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे नवरात्र उत्सवाच्या आयोजनाची परंपरा दहा वर्षांपासून महिलांच्या पुढाकाराने टिकवली जात आहे. विशेष म्हणजे महिलांकडून चालविले जाणारे हे शिरूर तालुक्यातील एकमेव महिला मंडळ आहे. जय माता दी महिला मंडळ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मंडळाचे नियोजन, संचालन आणि व्यवस्थापन तरुणींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभागातून केले आहे.
नवरात्र काळात दररोज देवीची आरती, भजन-कीर्तन, गरबा-दांडिया तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या मंडळांमार्फत केले जाते. मंडप उभारणे, सजावट, नियोजन आणि शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडणे या सर्व जबाबदाऱ्या महिलांनी स्वखर्चातून पार पाडल्या आहेत. विशेष म्हणजे, मंडळातील सर्व महिला मोलमजुरीचे काम करून नवरात्र उत्सव साजरा करतात.
अवघ्या पाच हजार रुपयांत २०१६ मध्ये अकरा महिलांनी सुरू केलेला उत्सव आज नावारूपाला आला असून सध्या मंडळात विविध जाती-धर्मातील २५ महिला सदस्य कार्यरत आहेत. माधुरी परदेशी या संस्थापक अध्यक्षा असून कुसुम ढगे उपाध्यक्षा, अनुराधा परदेशी सचिव व अनिता परदेशी खजिनदार आहेत. मंडळातील फरिदा सय्यद या एकमेव मुस्लिम महिला सदस्यामुळे या मंडळाने सामंजस्य आणि सलोख्याचे उदाहरण घालून दिले आहे.
नवरात्र काळात या महिला दहा वर्षांपासून काष्टी, कुरकुंभ, यवत येथून पायी ज्योत गावात घेऊन येतात. छाया परदेशी, सखुबाई राठोड, उषा परदेशी, कल्पना कुमावत, नयना परदेशी, सुनीता परदेशी, बेबी चव्हाण, साधना छल्लारे, फरिदा सय्यद, जयश्री जगताप, मोनिका हेंद्रे, वर्षा गरुड, वैशाली परदेशी, शीतल चटाले, मीनल परदेशी, शोभा परदेशी, मंगल खोमणे, नकुशा खोमणे, रेखा बढे, कोमल परदेशी, भारती बेलदार या मंडळाच्या सक्रिय सदस्य आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.