मांडवगण फराटा, ता. १८ : वडगाव रासाई (ता.शिरूर) येथे बेकायदेशीर आणि निर्दयीपणे गोवंश वाहतूक करण्याचा प्रयत्न मांडवगण फराटा पोलिस व गोरक्षकांनी यशस्वीरीत्या उधळून लावला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गोवंश वाहतूक करणाऱ्या वाहन चालकासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भाऊसाहेब टेंगले यांनी फिर्यादी दिली आहे. पोलिसांनी एक टेम्पो, एक मोटार व ११ गाई असा एकूण आठ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हातीक रफीक शेख,(रा.कारंजा रोड,ता.बीड), ओंकार दशरथ सायकर, (रा.राहू,ता.दौंड), अमोल राजेंद्र नातू, (रा.पिंपळगाव, ता.दौंड), अशोक भास्कर रणदिवे, (रा.रांजणगाव सांडस,ता.शिरूर) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी(ता. १५) मध्यरात्री गोरक्षक अमोल आनंदा चौगुले यांनी वडगाव रासाई दिशेने एक चारचाकी मोटार जात होती. तिच्या मागे असलेल्या टेम्पोत ११ गाई दाटीवाटीने घेऊन जात असल्याबाबत पोलिसांना माहिती दिली. यावेळी रात्रगस्तीवर असलेले पोलीस अंमलदार भाऊसाहेब शहाजी टेंगले व पोलीस हवालदार एस.पी.खबाले यांना एम एच १२ एल.जे ०२४८ ही मोटार जात असून तिच्यामागे एम.एच १७ ओ.जी ९३५८ हा टेम्पो गाईने भरलेला पोलिसांना दिसला.यावेळी टेम्पोचालकाला थांबवून पोलिसांनी चौकशी केली. यावेळी ओंकार दशरथ सायकर (रा.राहू,ता.दौंड) याच्या सांगण्यावरून गाईची वाहतूक करत असल्याचे टेम्पोचालक रफीक शेख याने सांगितले. टेम्पोमधील गाई खडकत (ता.जामखेड,जि.बीड) येथे कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचे यावेळी पोलिस तपासात निष्पन्न झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.