पुणे

मांडवगणला डॉक्टर सुट्टीवर, ग्रामस्थ संतप्त

CD

मांडवगण फराटा, ता.२५ : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा प्राथमिक आरोग्य केंद्रात गुरुवारी (ता. २३) दुपारपर्यंत वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने उपचारासाठी आलेल्या रुग्णांना अक्षरशः विनाकारण थांबावे लागले. डॉक्टर आणि कर्मचारी दोघेही गैरहजर असल्याने नागरिकांना खासगी दवाखान्यांचा आश्रय घ्यावा लागला. या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मांडवगण फराटा हे शिरूर तालुक्यातील महत्त्वाचे बाजारपेठेचे गाव असून येथील आरोग्य केंद्रात शिरूर आणि दौंड तालुक्यातील नागरिक उपचारासाठी येतात. या केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी आणि आठ कर्मचारी कार्यरत आहेत. तथापि, गुरुवारी सकाळी उपचारासाठी आलेल्या रुग्णांना ‘‘आज डॉक्टर सुट्टीवर आहेत, तपासणी उद्या होईल’’ असे सांगण्यात आले. शासकीय सुट्टी असूनही आपत्कालीन सेवेसाठी एका डॉक्टरची उपस्थिती अपेक्षित असते. मात्र, गुरुवारी दुपारी १२ वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकारी आणि बहुतांश कर्मचारी अनुपस्थित होते. आरोग्य केंद्रातील सर्व खोल्या, स्वच्छतागृह आणि परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते. डॉक्टरांच्या केबिनसमोर माती, चिखल व कचरा साचलेला दिसून आला. सकाळच्या वेळी एक परिचर वगळता कोणताही कर्मचारी उपस्थित नव्हता. त्यामुळे तपासणी, लसीकरण आणि दैनंदिन आरोग्य सेवा ठप्प झाली होती. दरम्यान, उपस्थित परिचर महिलेला रुग्ण नोंदणीपासून उपचारापर्यंत सर्व कामे एकटीने पार पाडावी लागली. ब्या प्रकरणी ग्रामस्थांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश कट्टीमणी यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीनंतर दुपारी बाराच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक दिवेकर आरोग्य केंद्रात दाखल झाले आणि तपासणीला सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. हंकारे यांच्या आदेशानुसार आरोग्य केंद्राची साफसफाई करण्यात आली.

आज खोकल्याचे औषध घेण्यासाठी दवाखान्यात आलो होतो.मात्र, डॉक्टर नसल्याने ‘उद्या या’ असे सांगण्यात आले. अनेकांना खासगी दवाखान्यांचा रस्ता धरावा लागला. रुग्णांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी.
- नीलेश कोंडे, ग्रामस्थ

मांडवगण फराटा येथील आरोग्य केंद्राच्या प्रकाराबाबत वरिष्ठांना पत्रव्यवहार केला आहे.आरोग्य केंद्रात दुचाकी लावणारा संबंधित कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.
- संपत फराटे, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, शिरूर तालुका

मांडवगण फराटा आरोग्य केंद्राबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संबंधित घटनेची चौकशी करून कारवाई केली जाईल.
- डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Patient Missing: खळबळजनक घटना! दोन महिन्यांपूर्वी ICU मध्ये दाखल केल अन्... भाजप नेत्याचे सासरे ससून रुग्णालयातून गायब?

Mumbai News : अंधेरी स्थानकातच तरुणीच्या धर्मांतराचा प्रयत्न? वृ्द्ध करत होता प्रार्थना; प्रवाशानं शूट केला व्हिडीओ

Latest Marathi News Update LIVE : पंतप्रधान मोदींचे शपथविधी स्थळावर आगमन

Bharatbhushan Kshirsagar: बीडचे शरद पवार! कोण आहेत भारतभूषण क्षीरसागर? ऐन निवडणुकीत त्यांची एवढी चर्चा का होतेय?

माधुरी दीक्षितचा नवा अंदाज, 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये दिसणार धकधक गर्ल, साकारणार सीरियल किलरची भूमिका

SCROLL FOR NEXT