मांडवगण फराटा, ता. २७ : मांडवगण फराटा (ता.शिरूर) येथील शेतकरी रूपेश पंढरीनाथ फराटे यांनी २१ गुंठे क्षेत्रात घेवड्याचे (संक्राती वाल)तब्बल पाच टन उत्पादन घेतले आहे. सेंद्रिय शेतीतून घेतल्या यशस्वी प्रयोगाची पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
लागवडीसाठी जमिनीत कुजलेले दोन ट्रेलर शेणखत व स्लरीचा वापर,तसेच ठिबक सिंचनाचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्यामुळे हे भरघोस उत्पादन मिळाल्याचे फराटे यांनी सांगितले. घेवड्यासाठी आतापर्यंत सुमारे एक लाख बारा हजार रुपयांचा भांडवली खर्च झाला आहे. आतापर्यंत वालाचे पाच तोडे झाले आहेत. बाजारपेठेत प्रतिकिलो ४० ते ७० रुपये दर मिळाला आहे.
मांडवगण फराटा येथे रूपेश फराटे यांची पाच एकर शेती आहे.त्यापैकी साडे चार शेतात ऊस व कांदा पीक असून २१ गुंठे क्षेत्रात त्यांनी घेवड्याची लागवड केली.वाल पिकासाठी जमीन नांगरून रोटरच्या साहाय्याने बेड तयार करण्यात आले.या बेडमध्ये घरच्या घरी तयार केलेले कुजलेले शेणखत व स्लरी मिसळून ठिबक सिंचन बसविण्यात आले.७ × २ या अंतरावर ‘अंकुर’ जातीच्या बियाण्यांची लागवड करण्यात आली.सेंद्रिय खतांसोबत लागवडीच्या सुरुवातीच्या टप्प्यात दोन वेळा आळवणी घेण्यात आली. शेणखत, गूळ, गोमूत्र, शेण व ताक यापासून तयार केलेल्या स्लरीचा नियमित वापर करण्यात आला.ठिबक सिंचनामुळे पाण्याचा योग्य वापर झाला असून रोपांची वाढ व फळधारणा उत्कृष्ट झाली आहे.वाशी व स्थानिक बाजारपेठेत घेवड्याला प्रतिकिलो ४० ते ७० रुपये दर मिळत असून,या यशस्वी शेतीत आई विजया, पत्नी सुवर्णा, मुलगा हर्षवर्धन यांची मोलाची साथ लाभत असल्याचे फराटे यांनी सांगितले.
रासायनिक खताचा वापर टाळला
फराटे यांनी लागवडीपासून पीक काढणीपर्यंत सातत्याने मेहनत घेतली. वेळेवर खतांचे डोस, खुरपणी, पाणी व्यवस्थापन व फवारणी केल्यामुळे कोणताही रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय निविष्ठांच्या साहाय्याने दर्जेदार उत्पादन घेतले आहे.
खर्च वजा जाता आजपर्यंत सुमारे ७० हजार रुपयांचा नफा मिळाला आहे. पुढील काळात मकर संक्रात काळात या घेवड्याला मोठी मागणी असल्याने सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
- रूपेश फराटे, घेवडा उत्पादक
दृष्टिक्षेपात खर्च (रुपयांत)
स्टेजिंग .........३०,०००
फवारणी .........३०,०००
मजुरी.........२०,०००
खते.........१०,०००
ठिबक सिंचन .........१६,०००
बियाणे .........३,०००
लागवड खर्च .........३,०००
02587, 80237
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.