पुणे

चासकमान डाव्या कालव्यातून पाणी सोडा

CD

आंधळगाव, ता. ३० : निर्वी (ता. शिरूर) गावात सध्या पिण्याचे पाणी व शेतीसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून, परिस्थिती गंभीर बनली आहे. या पार्श्वभूमीवर निर्वी ग्रामपंचायतीच्यावतीने चासकमान पाटबंधारे विभागाकडे लेखी निवेदन सादर करत डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भातील अर्ज कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आला आहे.
निर्वी गावाची लोकसंख्या सुमारे ३,३०२ इतकी असून, सध्या गावातील पिण्याच्या पाण्याचे सर्व प्रमुख स्रोत पूर्णतः आटले आहेत. लघू बंधारे, सार्वजनिक व खासगी विहिरी, तसेच बोअरवेल बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक वस्त्यांमध्ये पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, महिलांवर व ज्येष्ठ नागरिकांवर पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली आहे.
पाणीटंचाईचा गंभीर परिणाम शेती क्षेत्रावरही होत आहे. रब्बी हंगामातील पिके धोक्यात आली असून, चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत असून, शेतीपूरक व्यवसायांवरही त्याचा विपरीत परिणाम जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर चासकमान डाव्या कालव्यातून निर्वी गावातील कॅनालद्वारे बंधारे, विहिरी व बोअरवेल पुनर्भरणासाठी तातडीने पाणी सोडावे, अशी ठाम मागणी ग्रामपंचायतीने निवेदनाद्वारे केली आहे. या पाण्यामुळे गावातील पिण्याचे पाणी व शेतीसाठी आवश्यक जलसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास ग्रामपंचायतीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
उन्हाळ्याचे दिवस जवळ येत असताना पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता, प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी सरपंच भाग्यश्री बुऱ्हाडे, माजी उपसरपंच प्रकाश पवार, विशाल शेळके, शरदराव नलगे, गोकूळ सोनवणे, कमलेश बुराडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Australia Open 2026: अल्काराजचेच वर्चस्व! जोकोविचविरुद्ध दणक्यात पुनरागमन करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Union Budget 2026: 'या' लोकांसाठी अर्थसंकल्प ठरला अपूर्ण आशांची कहाणी; अपेक्षा काय होत्या, काय मिळाले? वाचा सविस्तर...

VIDEO : विकृतीचा कळस! श्वानाच्या पिल्लाला जबरदस्ती पकडलं अन् दारू पाजली; तरुणांचं संतापनजक कृत्य

Union Budget Focus on Election-Bound States : बंगाल, आसाम, केरळसह निवडणूका होणाऱ्या राज्यांना मोदी सरकारच्या अर्थसंकल्पातून नेमंक काय मिळालं?

Mumbai News: टिळक पुलाचे ७० टक्के काम पूर्ण, २०२६ अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत

SCROLL FOR NEXT