आळंदी, ता. ११ : कार्तिकी वारीच्या पार्श्वभूमीवर आणि दिल्ली येथे झालेल्या स्फोटाच्या धर्तीवर सतर्कता म्हणून आळंदीमधील संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर आणि इंद्रायणीकाठी आळंदी शहर पोलिसांनी कसून तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिनानिमित्त कार्तिकी वारी सोहळा सुरुवात झाली असून वारकरी आळंदीत दाखल होऊ लागले आहेत. दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी आळंदी शहर पोलिस दक्षता घेत आहेत. वारीच्या अनुषंगाने पोलिसांचा बंदोबस्त दाखल झाला आहे. बीडीएस पथकाच्या वतीने संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरातील ओवऱ्या, दर्शन मंडप तसेच महाद्वार इंद्रायणी घाट या ठिकाणी तपासणी करण्यात आले. संशयास्पद वस्तू तसेच घातपातासारखे कृत्यापासून दक्षता घेण्यासाठी ही तपासणी पोलिसांकडून कसून करण्यात येत आहे. याचबरोबर वारी काळात शहरातील ठिकाणी वॉच टॉवर उभारण्यात येत आहेत. या ठिकाणी दुर्बिणीद्वारे पोलिस लक्ष ठेवणार आहेत. हॅन्ड मेटल डिटेक्टरद्वारे ठिकठिकाणी पिशव्या बॉक्स तसेच कानकोपऱ्यांची तपासणी मंदिर परिसरात पोलिसांनी केली. वारी काळात ही तपासणी सुरू राहणार आहे. वारकरी तसेच स्थानिक नागरिकांनी वारी काळामध्ये संशयास्पद वस्तू आगर संशयास्पद हालचाल आढळल्यास जवळच्या पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन आळंदी पोलिसांकडून करण्यात आले आहे. लाखोंच्या संख्येने वारकरी आळंदीत येत असल्याने सर्वांच्या सुरक्षेसाठी पोलिस यंत्रणेकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.
पोलिसांचा तगडा बंदोबस्त
साहाय्यक अधीक्षक : ०५
निरीक्षक : २८
उपनिरीक्षक : १००
अंमलदार : ७७५
होमगार्ड : ६००
एनडीआरएफ : ०२ तुकड्या
बीडीएस : ०२ पथके
6686
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.