पुणे

आळंदीत १६१ अर्ज वैध

CD

आळंदी, ता. १८ : आळंदी (ता. खेड) नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्जाच्या छाननी प्रक्रियेमध्ये ९९ उमेदवारांचे १६१ अर्ज वैध, तर उर्वरित ६७ अर्ज बाद झाले. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आता अध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार आणि दहा प्रभागातील २१ सदस्यपदांसाठी ९९ उमेदवार असणार आहेत.
निवडणूक निर्णय अधिकारी जयराज देशमुख आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर परिषदेच्या दहा प्रभागांसाठी २१ नगरसेवक सदस्यपदांसाठी २१३ उमेदवारी अर्ज आले होते. तर, खुल्या गटातील नगराध्यक्षपदासाठी १६ जणांनी उमेदवारी अर्ज भरले होते. यामध्ये नगराध्यक्षपदासाठीच्या १६ अर्जापैकी केवळ नऊ जणांचे अर्ज वैध ठरले. एकूण २१३ उमेदवारी अर्ज २१ सदस्यपदाच्या जागा करता भरले होते. केवळ ९९ उमेदवारांचे १६१ अर्ज वैध ठरले, तर ६७ अर्ज बाद झाले.

महायुतीतच लढाई
नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने अधिकृत उमेदवार दिले आहेत. तर, प्रभागनिहाय २१ सदस्यपदांकरिता राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तीनही महायुतीमधील पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले आहेत. राष्ट्रवादीला काही प्रभागात उमेदवार मिळाले नाहीत, तर शिवसेनेने काही ठिकाणी भाजपच्या विरोधामध्ये उमेदवार दिले आहेत. त्यामुळे निवडणूक महायुतीमधील मित्र पक्षांमध्येच होणार असल्याचे चित्र आहे.

आळंदी नगर परिषद निवडणूक
नगराध्यक्षपदासाठी दाखल एकूण अर्जांची संख्या- १६
एकूण अपात्र अर्जांची संख्या- ०७
एकूण पात्र अर्जांची संख्या- ९

नगरसेवकपदासाठी दाखल अर्जांची संख्या- २१३
एकूण अपात्र अर्जांची संख्या- ६७
एकूण पात्र अर्जांची संख्या- १६१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT