आळंदी, ता. १२ : येथील ज्ञानेश्वर विद्यालयाच्या क्रीडा महोत्सवास सोमवार (ता. ८) पासून सुरुवात झाली आहे. यावेळी कला- क्रीडा क्षेत्रात तालुका, जिल्हा, राज्य पातळीवर विद्यालयाचा नावलौकिक वाढविणाऱ्या २७ विद्यार्थ्यांचा आणि जिल्हास्तरावर पुरस्कार प्राप्त चार शिक्षकांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
अमरावती येथील बार्डी गावचे सरपंच आणि उद्योजक प्रवीण ढवळी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी पुणे येथील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन अध्यक्ष ॲड. मुकेश परदेशी, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दीपक चौधरी, अनिल वडगावकर, श्रीधर कुऱ्हाडे, पालक संघाचे उपाध्यक्ष श्रेणिक क्षीरसागर, मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य किसन राठोड, पर्यवेक्षिका अनुजायिनी राजहंस, संगीता पाटील आदी उपस्थित होते. पर्यवेक्षिका अनिता गावडे यांनी प्रास्ताविक, तर गणेश लिखे यांनी सूत्रसंचालन केले. उज्ज्वला कडलासकर आणि क्रीडा शिक्षक योगेश कांबळे यांनी आभार मानले.